चौथ्या स्तंभावर बंधने वाढूनही काही पत्रकारांचे काम वाखाणण्याजोगे ॲड गौतम चाबुकस्वार यांचे प्रतिपादन *उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

SHARE NOW

पिंपरी :माध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. मात्र या चौथ्या स्तंभावर बंधने वाढत आहेत. गोदी मीडिया म्हणून त्याला हिनवले, संबोधले जात आहे. याही परिस्थितीत कोणाचाही मुलाहिजा न ठेवता निर्भीडपणे पत्रकारिता करणारे , सत्तेला प्रश्न विचारणारे नंदकुमार सातुर्डेकर यांच्यासारखे पत्रकार दीपस्तंभासारखे असल्याचे प्रतिपादन पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार ऍड गौतम

चाबुकस्वार यांनी येथे केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विजयनगर काळेवाडी येथील कारवार कोकण समाज हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात मराठी पत्रकार संघाच्या शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नंदकुमार सातुर्डेकर यांचा तसेच विविध क्षेत्रातील विविध क्षेत्रातील सविता जाधव शोभा धावटे, डॉ. अलवी सय्यद नासेर इब्राहिम, डॉ राजेंद्र किरके, रितू पसरीचा, विजयश्री काजळे, डॉ. संजय मांडलिक, डॉ. पियुशा कडूस , गीता जोशी, रणदिवे सर, रवींद्र फडतरे, डॉ. अभिजीत शेखर, संजय गायखे, प्रकाश तांबोरे, डॉ. प्रकाश जाधव, डॉ. भूषण ढालपे, अनिकेत वढणे, वैष्णव जाधव, राज नखाते, जया चासकर या मान्यवरांचा,अनुष्का येळवे सृष्टी पवार श्रेया अलर, सार्थक आहेर या खेळाडूंचा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा माजी आमदार ऍड.गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी संयोजक शिवसेना विधानसभा प्रमुख हरेश नखाते, शिवसेना काळेवाडी विभाग संघटिका सुजाता नखाते, महिला शहर संघटिका रूपाली आल्हाट, शिवसेना जिल्हा समन्वयक सुशीला पवार, वैभवी घोडके,उपजिल्हाप्रमुख दस्तगीर मणियार, गोरख पाटील, संवाद व्यासपीठचे हरीश मोरे, ह्यूमन राइट्स संघटनेच्या अनिता वर्मा, आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

 

यावेळी ऍड चाबुकस्वार म्हणाले की, नुसते जगण्यात काही अर्थ नाही. सतत काहीतरी वेगळे सामाजिक काम करायला हवे. पुरस्कारांमुळे चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळते असे ते म्हणाले.

सत्काराला उत्तर देताना सातुर्डेकर म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात काम करणारी व्यक्ती कोणीतरी आपला सत्कार करावा म्हणून काम करत नाही. तर त्या कामातून मिळणारा स्वानंद हीच त्याची प्रेरणा असते. पण कोणीतरी पाठीवर थाप मारली की केल्या कामाचे चीज झाल्यासारखे वाटणे हा मानवी स्वभाव आहे. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला त्यांचा उल्लेख करून ते म्हणाले की, भारतीय संस्कृती ही ज्ञानाची उपासना व गुणांची पूजा करणारी संस्कृती आहे. मात्र केवळ गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांनी सामान्यज्ञान,इंग्रजी, हिंदी, परदेशी भाषांचे ज्ञान आत्मसात करायला हवे. ए आय सारख्या तंत्रज्ञानाचा मुकाबला करण्यासाठी आपण परिपक्व व्हायला हवे असे सातुर्डेकर म्हणाले.

सुजाता नखाते यांनी प्रास्ताविक केले. गोरख पाटील यांनी सूत्रसंचालन केले. हरेश नखाते यांनी आभार मानले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page