“दोन समाजांत तेढ निर्माण करणारा लक्ष्मण हाके अखंड मराठा समाजाच्या निशाण्यावर”गुन्हा दाखल करण्याची मागणी
मावळ :

मावळ तालुक्यातील स्वतःला नेता म्हणवणाऱ्या लक्ष्मण हाके या मनोरुग्ण व्यक्तीविरोधात आज अखंड मराठा समाज मावळ तर्फे मोठी कारवाई करण्यात आली. महिलांविषयी अश्लील आणि अपमानास्पद वक्तव्ये करणारा तसेच दोन समाजांमध्ये तणाव व तेढ निर्माण करणारा हाके याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली.
अखंड मराठा समाजाचे प्रतिनिधींनी पी. आय. कुमार कदम यांना निवेदन सादर करत हाके याच्यावर तात्काळ गुन्हा नोंदवावा, अशी ठाम मागणी केली.
याचबरोबर, तहसीलदार कार्यालयात देखील एक निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये:
कुणबी नोंदींची पुन्हा फेरतपासणी,त्या नोंदी ग्रामपंचायतीमध्ये सार्वजनिकरित्या डिस्प्ले करणे,
तसेच कुणबी दाखल्यांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करणे,अशा महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या.
नायब तहसीलदारांनी सर्व मागण्यांची अंमलबजावणी करण्याचे लिखित आश्वासन दिले असून, गुरुवारी याबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार आहे.
🚩 “एक मराठा, लाख मराठा” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. 🚩






