मावळ विहार सेवा ग्रुप चे ४ थे विहार संमेलन श्री पार्श्र्वप्रज्ञालय तिर्थ तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाले.
तळेगाव दाभाडे :
दि. १७.२.२०२५ रोजी मावळ विहार सेवा ग्रुप चे ४ थे विहार संमेलन श्री पार्श्र्वप्रज्ञालय तिर्थ तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाले. प.पु.साधु-साध्वीजी भगवंत व विहार सैनिक यांच्या विहार मधील सुरक्षिते बाबत विचार विनीमय होवुन सुरक्षेसाठी विहार टि शर्ट, लाल स्टिक, बॅटरी, इद्यादि सुरक्षे निगडीत उपकरणांचा वापर, विहार करताना रस्त्याच्या कोणत्या बाजुने विहार करावा, विहार मध्ये मोबाईल चा वापर, विहार सुरु होण्याच्या वेळेचे पालन व विहार सुरु करण्याची वेळ ,या विषयावर सविस्तर चर्चा होवुन, ठोस निर्णय एकमताने मंजुर करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन सुत्र संचालन श्री राकेशजी ओसवाल यांनी केले. ग्रुपचे माजी कॅप्टन श्री अरविंद जी कटारिया यांच्या कार्यकाल मध्ये मावळ विहार सेवा ग्रुप ला सन २०२४ ची सर्वोच्च विहार केल्या बद्दल ऑल महाराष्ट्र विहार ट्राफी मिळाली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सन २०२५ चे साठी श्री सुरेशभई दोशी यांनी मावळ विहार सेवा ग्रुपच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला.