मावळ तालुका शिवसेनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न!
मावळ :
मावळ तालुका शिवसेनेच्यावतीने वडगाव मावळ येथे दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मावळ लोकसभा चे लोकप्रिय महाससंद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंजकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरदराव हुलावळे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, शिवसेना तालुका प्रमुख राजाभाऊ खांडभोर, माजी कॅन्टोन्मेंट सदस्य रघुवीर शेलार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच शिवसेना उपतालुका प्रमुख अमित कुंभार , राम सावंत,सोमनाथ कोंडे धनंजय नवघणे, संघटक मदन शेडगे युवासेना उपजिल्हा प्रमुख दत्ता केदारी, मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, युवासेना तालुका प्रमुख राजेश वाघोले, देहूगाव शहर प्रमुख सुनील हगवणे,वडगाव शहर प्रमुख प्रवीण ढोरे मा. नगरसेविका कल्पनाताई आखाडे, नितीन देशमुख,योगेश खांडभोर आर्यन खांडभोर व लोणावळा महिला शहर संघटिका मनीषाताई भांगरे यांची उपस्थिती लाभली.
विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा खासदार साहेब यांनी दिल्या अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि प्रेरणा मिळते. शिवसेनेच्यावतीने नेहमीच गुणवंतांचा सन्मान करण्यात येतो हे अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन सुस्थितीत झाले असून पालक व ग्रामस्थांनीही त्याचे स्वागत केले.