*सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन*
तळेगाव दाभाडे :
Advertisement
दि. २१ तळेगाव दाभाडे मस्करनेस कॉलनी येथील सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन घेण्यात आला. योगगुरु सीमा इनामदार यांचा मुख्याध्यापिका रंजिता थंपी यांच्या हस्ते सत्कार केला. त्यांनी योग दिनाचे आणि ध्यानाचे महत्त्व सांगून मुलाधार चक्रांचा उपक्रम विद्यार्थ्यांकडून करवून घेतला. मानसिक आणि शारीरिक बळ वाढण्याकरता ध्यानधारणेचे आपल्या आयुष्यातील महत्त्व सांगत वृक्षासन, ताडासन अशी आसने देखील विद्यार्थ्यांना शिकवण्यात आली.६वी व ७वी च्या विद्यार्थ्यांनी योगासनांचे पिरॅमिड उत्कृष्ट पद्धतीने सादर केले. कार्यक्रमाचे नियोजन आश्विनी खडतरे व पुनम फडतरे यांनी केले. सूत्रसंचालन मुग्धा बोरकर या विद्यार्थिनीने केले.






