अकरावा आंतरराष्ट्रीय योगादिन बालविकास विद्यालयात साजरा.
तळेगाव दाभाडे.
स्नेहवर्धक मंडळ सोशल व एज्युकेशनल ट्रस्ट बालविकास विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही 11वा आंतरराष्ट्रीय योगा दिन पावसाळी आल्हाददायी वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . सकाळी 8.30 वाजता कार्यक्रमास सुरुवात झाली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक सौ शितल महाले व योगा अभ्यासक कुमारी समीक्षा महाले हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिक्षक श्री रेवन्नाथ सातपुते यांच्या प्रार्थनेने योग साधनेस सुरुवात झाली.
पूर्व प्राथमिक विभाग ते ज्युनियर कॉलेज यातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व दोन ते अडीच हजार विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग दर्शविला. विद्यार्थ्यांनी योगासनाची वेगवेगळे आसने प्रात्यक्षिक स्वरूपात करून दाखविले .
पूर्व प्राथमिक विभागाच्या चिमुकल्यांनी देखील येथे प्राणायाम पासून सूर्यनमस्कार पर्यंतची सर्व आसने अगदी आनंदाने केली. वृक्षासन, ताडासन, पद्मासन, वज्रासन, सूर्यनमस्कार, अनुलोम,विलोम, भ्रामरी प्राणायाम, प्राणायाम, अशी आसने केली. योगा व रोप मल्लखांब करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विशेष प्रात्यक्षिक करून दाखविले.
प्रमुख पाहुणे प्रा सौ शितल महाले यांनी विद्यार्थ्यांना प्राणायाम, श्वासावरील नियंत्रण व त्याचे फायदे याविषयी विशेष मार्गदर्शन केले. समीक्षा महाले यांनी विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष संवाद साधून योगाचे महत्त्व पटविले.
मुख्याध्यापिका सौ नूतन कांबळे यांनी व्यायामाचे महत्त्व व योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रमुख उपस्थिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ नूतन कांबळे, पर्यवेक्षक श्री दीपक खटावकर,श्री सागर केंजूर, सौ वंदना भोळे, अमृता देशमुख ,शिक्षक वृंद व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्री सुनील उकाळे , आसने कार्यक्रम रूपरेषा सौ दिपाली वारे , सौ अश्विनी आंबेटकर, प्रार्थना व शांतीपाठ श्री रेवन्नाथ सातपुते ,सूत्रसंचालन सौ निलांबरी महाजन ,सौ सुनिता प्रभू व आभार श्री महादेव खरटमल, सौ ज्योती शिंदे यांनी केले. शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली.