नवलाख उंब्रे : श्रीराम विद्यालयाचा दहावीचा निकाल ९८.८२ टक्के
नवलाख उंब्रे :
नवलाख उंब्रे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे श्रीराम विद्यालयाने दहावीच्या परीक्षेत ९८.८२ टक्के निकालाची उज्वल कामगिरी केली आहे. एकूण ८५ विद्यार्थ्यांपैकी ८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेने उत्कृष्ट शैक्षणिक परंपरेला साजेशी कामगिरी बजावली आहे.
या परीक्षेत अदिती अरुण सातपुते हिने ९३ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक मिळवला. वैष्णवी बाळू धायबर हिने ९२ टक्के गुण मिळवत द्वितीय तर राणी नाथा सातपुते हिने ९०.२० टक्क्यांसह तृतीय क्रमांक मिळवला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, शालेय समिती अध्यक्ष युवराज काकडे, मुख्याध्यापक विनय गायकवाड यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे अभिनंदन केले.
शाळेतील यशामध्ये शिक्षकवृंदांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे.