*मळवंडी ढोरे शाळेत शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न..*
मावळ :
पवन मावळातील मळवंडी ढोरे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
शिवप्रतिमेचे पूजन बाल सभेचा अध्यक्ष उत्कर्ष विकास ढोरे,सरपंच गोरख ढोरे ,उपसरपंच प्रकाश ढोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवर व शिक्षकांच्या शुभहस्ते शिवरायांची आरती घेण्यात आली. इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थिनींनी शिवरायांचा पाळणा गायला.तसेच दूर्वा गणेश ढोरे हिने विद्यार्थ्यांसमवेत ‘प्रतापगडावरील पराक्रम’ या प्रसंगावर आधारित छान पोवाडा सादर केला. विद्यार्थ्यांनी शिवरायांबद्दलची महती सांगणारी भाषणे केली. धिरजकुमार जानराव, मुख्याध्यापक राजू भेगडे व सरपंच गोरख काशिनाथ ढोरे यांनी मनोगत व्यक्त केले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी राजं आलं राजं,आम्ही शिवकन्या व युगत मांडली इ.गाण्यांवर नृत्ये सादर केली.
सातवीची विद्यार्थिनी सृष्टी अनिल ढोरे हिने सूत्रसंचालन तर सार्थक भाऊ ढोरे या विद्यार्थ्यांने आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमासाठी सरपंच गोरख काशिनाथ ढोरे,उपसरपंच प्रकाश लक्ष्मण ढोरे, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर ढोरे,माजी सरपंच भगवान कांबळे, चंद्रकांत ढोरे,रेणुका जाधव, तानाजी जाधव,उत्तम ढोरे, सोनाली गायकवाड, संध्या ढोरे इ मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक राजू भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली धिरजकुमार जानराव, सरोजा अंबुलगे व पूजा राऊत यांनी केले.