महावीर जयंतीनिमित्त तळेगावात विविध उपक्रमांचे आयोजन

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

येथील जैन मंडळांतर्फे महावीर जयंतीनिमित्त विविध समारंभ आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (दि. 10) विविध जैन मंदिरांमध्ये ध्वजारोहण, भगवान महावीर यांच्या प्रतिमेची मिरवणूक, जलाभिषेक व पंचपूजा, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement

दरम्यान, बुधवारी(दि.९) आनंदनगरमधील कै. गो.नी. दांडेकर उद्यानात सकाळी झालेल्या विश्व नवकार महामंत्र पठणात जैन कुटुंबिय मोठ्या संख्येने सहभागी झाले. अत्यंत प्रसन्नमय वातावरणात भगवान महावीर यांचे स्मरण करण्यात आले. गुरुवारी यशवंतनगर मधील फ्रेन्डस् ऑफ नेचरशेजारील ज्येष्ठ नागरिक संघाच्या चाफेकर सभागृहात श्री 1008 भगवान महावीर दिगंबर जैन मंडळातर्फे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाचे आयोजन केले आहे. मंडळाचे अध्यक्ष सुभाष काळे, कार्यवाह डॉ. शरद सोनटक्के आणि उपाध्यक्ष प्रकाश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली जन्मोत्सव समितीचे दीपक साखरे, प्रदीप ढोकर व सहकाऱ्यांनी संयोजन केले आहे. सकाळी छत्रपती शिवाजी चौकातून भगवान महावीर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर यशवंतनगरस्थित ज्येष्ठ नागरिक संघाच्या चाफेकर सभागृहात दिगंबर जैन महिला मंडळातर्फे महामंत्र पठण करण्यात येईल. ध्वजारोहण, जलाभिषेक, पंचपूजा व पाळणा आदी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, जैन अल्पसंख्याक समाजाचे अभ्यासक प्रा. प्रदीप फलटणे यांचे जैन धर्म व बहुजन समाज या विषयावर व्याख्यान होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सुभाष काळे, प्रकाश चिवटे यांनी दिली.

 


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page