हरियाणा पलवाल येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत अनुष्का दहिभाते ने पटकवला प्रथम क्रमांक
सोमाटणे:
पलवाल (हरीयाना) येथे भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने १७ वर्षाखालील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा संपन्न होत असून.दि. २५ ते २७ मे रोजी या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी दि.२१ मे रोजी म्हाळुंगे – बालेवाडी येथे महाराष्ट्र कुस्ती महासंघाची निवड चाचणी घेण्यात आली. या निवड चाचणीत ५१७ कुस्तीगीरांनी सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेमध्ये गुरुकुल आंतरराष्ट्रीय शंकर कंधारे कुस्ती संकुल सोमाटणे येथील महिला पैलवान अनुष्का शहिदास दहिभाते हिने ४३ किलो वजनी गटात मध्ये प्रथम क्रमांक मिळवला.या स्पर्धेसाठी तिचे नॅशनल कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असून तिला मोलाचे मार्गदर्शन आंतरराष्ट्रीय पैलवान शंकर कंधारे व एन.आय.एस पंच शिवाजी मोहिते व ऑल इंडिया चॅम्पियन शंकर मोहिते व गुरुकुल कुस्ती संकुल यांचे सहकार्य लाभले. निवडीमुळे अनुष्का चे मावळ तालुक्यात अभिनंदन केले जात आहे.