*तळेगाव येथे वृक्ष बीजरोपण प्रकल्प*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरात हरणेश्वर टेकडीवर मंगळवारी(दि.२७)सकाळी ८वा.सुमारास देवराई संस्था मावळ आणि रघुनाथ ढोले देवराई थेऊर यांच्या संयुक्त विद्यमाने देशी बीज रोपन प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले आहे.देवराई संस्थेने सुमारे ७०००हजार पळस,रानपांगार,खैर,पिंपळ,हिवर,करज वड आदी २०प्रकारच्या वृक्षांच्या बीया उपलब्द केलेल्या आहेत तरी सर्व वृक्षप्रेमी नागरिकांनी आंबा,जांभूळ,फणस आदीं देशी बीया घेवून याव्यात.येताना खुरपे आदी साहित्य घेवून यावे.तसेच सुमारे दोन लिटर पाणी घेवून उपस्थित रहावे. अशी माहिती तळेगाव नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गिरीष खेर यांनी दिली.