कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानतर्फे 31 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर दरम्यान दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी, प्रतिनिधी :

पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व राजेंद्र जगताप मित्रपरिवार यांच्या वतीने 31 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर दरम्यान नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी दिली.

Advertisement

या दिवाळी पहाटमध्ये पहिल्या दिवशी उद्या 31 ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाच वाजता पार्श्वगायिका ज्योती गोराणे, गायिका निकिता बहिरट, गायिका भक्ती कापरे यांचे गायन होईल. त्यांना हार्मोनियमवर पूजा वाणी, ढोलकीवर लक्ष्मी कुडाळकर आणि सहगायिका राधिका साकोरे संगीत साथ करतील. पहिल्या दिवशी श्रद्धा वरानकर निवेदन करतील. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 01 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध पार्श्वगायिका गायत्री शेलार, पार्श्वगायक सुजित सोमण, गायक आकी अक्षय आणि स्टार गायिका अश्विनी यांचे गायन होईल. याचे निवेदन शोभा कुलकर्णी करतील; तर महोत्सवात तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी सुप्रसिद्ध पार्श्वगायक चंद्रकांत शिंदे, सुपरस्टार छोटे उस्ताद फेम प्रांजल बोधक, पार्श्वगायक रोहित शिंदे, पार्श्वगायिका ममता नेने गोगटे यांचे गायन होईल. या कार्यक्रमाचे निवेदन शोभा कुलकर्णी करतील. या संपूर्ण दिवाळी पहाटचे सादरकर्ते विजय उलपे असून, संगीत संयोजक संतोष खंडागळे असणार आहेत.

पिंपळे गुरवकरांनी या दिवाळी पहाटमधील गायनाचा मनमुराद आस्वाद घ्यावा, असे आवाहन राजेंद्र जगताप यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page