केंद्रीय सहकार विकास महामंडळावर हर्षवर्धन पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल मावळ मध्ये सत्कार करण्यात आला.

SHARE NOW

मावळ :

भारत सरकारच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या जनरल कौन्सिलवर राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची सदस्यपदी निवड झाली आहे. यासंबंधी भारत सरकारच्या राजपत्रामध्ये अधिसूचना केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाने शुक्रवारी दिनांक 2 फेब्रुवारी 2024 प्रसिद्ध केले. देशाचे गृहमंत्री व केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा हे राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत.

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून भारत सरकारच्या अधिपत्याखाली देशभर पुणे सह अठरा विभागीय कार्यालयांमार्फत कामकाज केले जात आहे. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या जनरल कौन्सिलवर सदस्य म्हणून निवड केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले.

Advertisement

राष्ट्रीय सहकार विकास महामंडळामार्फत सहकारी तत्त्वावर कृषी उत्पादने, अन्नपदार्थ औद्योगिक वस्तू, पशुधन आणि उत्पादने यांच्यावर प्रक्रिया विपणन साठवणूक निर्यात आणि आयात तसेच रुग्णालय आरोग्य सेवा आणि शिक्षणातील काही उत्पादने आणि सेवा यांचे नियोजन करणे आणि प्रोत्साहन देणे यासाठी काम केले जात आहे. तसेच देशातील विविध प्रकारच्या सहकारी संस्था साखर उद्योग यांना सहाय्य करणे आणि त्यांच्या आर्थिक पायाचा विस्तार करण्यासाठी राष्ट्रीय विकास महामंडळ केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे काम करीत आहे.

माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची निवड झाल्याबद्दल मावळ या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेत माजी उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे,तळेगाव शिक्षण मंडळाचे माजी सभापती विशाल वाळुंज यांनी पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी साते (मावळ) येथे भेट घेत सत्कार केला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page