चाकण नगरपरिषद नगराध्यक्ष पद बिन विरोध करू या : हिच भाऊंना खरी श्रद्धांजली ठरेल
आळंदी : *स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सर्व पक्षीय नेते व नागरिकांचे एकमुखी आवाहन!*
चाकण येथे स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. सुरेशभाऊंच्या कार्याची आठवण करत अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि सर्वसामान्यांसाठी त्यांनी केलेल्या कामामुळे खेड तालुक्याच्या कानाकोपऱ्यात त्यांचे योगदान आजही लोकांच्या मनात जिवंत आहे.
या प्रसंगी खेड तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये आरोग्य सेवा पुरस्कार – डॉ.अविनाश अरगडे व डॉ.भरत राऊत, शिक्षण रत्न पुरस्कार – दत्तात्रय वारे गुरुजी, कलारत्न पुरस्कार – चैतन्य देवढे माऊली (इंडियन आयडॉल फेम) व पीयूष तिवारी, वनश्री पुरस्कार – राजन जांभळे, पोलिस सेवा विशेष सन्मान – प्रकाश राठोड, सहाय्यक पोलिस निरीक्षक, चाकण वाहतूक विभाग, क्रीडारत्न पुरस्कार – आर्यन नितिन वरकड व समिक्षा ज्ञानेश्वर डुबे, उद्योगरत्न पुरस्कार – चेतन राजूशेठ कर्नावट व अभिजित गोरक्षनाथ बारवकर, सहकार भूषण – साईबाबा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चाकण तसेच सेवाभावी संस्था – ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समिती यांना सन्मानित करण्यात आले.
या वेळी भाऊंच्या आठवणींना उजाळा देताना शिवसेनेचे सचिव रामभाऊ रेपाळे, जुन्नर विधानसभेचे आमदार शरददादा सोनवणे तसेच सर्वपक्षीय नेते व नागरिकांनी एकमुखाने आवाहन केले की, श्रीमती मनिषाताई सुरेशभाऊ गोरे यांना चाकण नगरपरिषदेच्या बिनविरोध नगराध्यक्षपदी निवडून देऊ या हीच आमदार सुरेशभाऊ गोरे यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
ह.भ.प.रोहिणीताई परांजपे यांची कीर्तन सेवा झाली. यावेळी कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी होते. नागरिकांनी ‘भाऊंनी सुरू केलेले विकासाचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प’ व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रमात भाऊंच्या कार्याचा, त्यांच्या सुसंस्कृत व समर्पित नेतृत्वाचा आदरपूर्वक उल्लेख होत राहिला.
या प्रसंगी शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव रामभाऊ रेपाळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार शरददादा सोनवणे, बापू पठारे, बाबाजी काळे, मा.आमदार रामभाऊ कांडगे, शिरूर लोकसभा संपर्क प्रमुख विकासदादा रेपाळे, शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद, जिल्हापरिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टे, देविदास दरेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, अशोक खांडेभराड खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील, उपसभापती क्रांतीताई सोमवंशी, पंचायत समिती माजी सभापती अंकुश राक्षे, उपसभापती ज्योतीताई आरगडे, भाजपा सरचिटणीस प्रियाताई पवार, खेड शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र बुट्टे, तसेच ह.भ.प.सुप्रियाताई साठे, नानासाहेब टाकळकर, शांताराम बापू घुमटकर, हिरामण सातकर, सुधीर मुंगसे, शांताराम भोसले, डॉ.शैलेश मोहिते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाशदादा वाडेकर, शिवाजी वर्पे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, राजूशेठ जवळेकर, शिवसेना नेत्या विजयाताई शिंदे, चाकण नगरपरिषदेचे माजी नगरअध्यक्ष मंगलताई गोरे, शेखर घोगरे उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे तसेच सर्व नगरसेवक तसेच बाजार समितीचे सर्व संचालक, पंचायत समिती, खेड, आळंदी व चाकण नगरपरिषद, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती व इतर सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.






