मावळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रजनीगंधा खांडगे, उपाध्यक्षपदी पांडुरंग पोटे, संचालक मंडळाची बिनविरोध निवड.

तळेगाव दाभाडे : मावळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रजनीगंधा संतोष खांडगे यांची तर उपाध्यक्षपदी पांडुरंग रामभाऊ पोटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वडगाव येथील सहकार निबंधक कार्यालयामध्ये झालेल्या या निवडणुकीत मावळ सहकार पॅनलचे सर्व तेरा उमेदवार बिनविरोध निवडून आले. यावेळी राकेश निखारे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. संचालक मंडळाचा कार्यकाळ पाच वर्षाचा असणार आहे.

आगामी काळात पतसंस्थेच्या माध्यमातून सर्व सभासदांचे आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष रजनीगंधा खांडगे यांनी सांगितले.

Advertisement

मावळ नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य प्रवर्तक संतोष खांडगे, सल्लागार गणेश काकडे, ॲड. मच्छिंद्र घोजगे, सुदाम दाभाडे, सुनील भोंगाडे, केतन भालेराव, विलास टकले, मिलिंद शेलार आदींनी पतसंस्थेच्या नवीन कार्यकारणीचे अभिनंदन केले.

 

संचालक मंडळ पुढील प्रमाणे

अध्यक्ष : रजनीगंधा संतोष खांडगे

उपाध्यक्ष : पांडुरंग रामभाऊ पोटे

कार्याध्यक्ष : गिरीश रावळ

सचिव : शरदचंद्र कोतकर

खजिनदार : भालचंद्र लेले

सहसचिव : सचिन कोळवणकर

संचालक : लक्ष्मण मखर, अजय पाटील, विंन्सेंट सालेर, राहुल खळदे, विजयकुमार पुजारी, विनोद भोसले, निर्मला शेलार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page