कात्रज कोंढवा रस्त्यावर शरद पवार गटाचे आंदोलन.. माजी महापौर प्रशांत दादा जगताप, अमृताताई बाबर यांच्या उपस्थितीत आंदोलन..

SHARE NOW

कोंढवा पुणे

*काञज-कोंढवा रोड* येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे ठेकेदार व पुणे महानगरपालिकेच्या गलथान कारभार व चुकिच्या कामांमुळे काही दिवसापुर्वीच काञज कोढंवा रोड येथे रस्त्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्यात पडुन एका मुलीचा दुर्देवी मृत्यु झाला होता, मनपा प्रशासनाचे डोळे उघडावे व भविष्यात अशी दुर्घटना घडु नये, मुख्य रस्त्यावर वाहनारे ड्रेनेजचे पाणी व खड्डे दुरूस्ती तात्काळ करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्ष मा.महापौर प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली काञज कोढंवा रोड,एसबीआय बँकेसमोर, गोकुळनगर, कोढंवा बु. पुणे येथे शातंतेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. या

वेळी

प्रशांत दादा जगताप,

अमृताताई बाबर,

सुरेश ऊर्फ बाळा कवडे,

डॉ सुनील जगताप, प्रवीण तुपे, हेमंत बधे, दिपक कामठे, स्वाती चिटणीस,

सुवर्णा सावरडे, रुपाली शेलार,जयश्री आदमाने,दिपाली कवडे,मोहमदिन खान,अर्जुन गोजे,सुनील मोहिते,पप्पू घोलप,मौलाना सय्यद,पियूष मोहिते,भूषण बधे,मधुसूदन कोरेकर,मंगेश चव्हाण,गीतांजली जाधव, पक्ष तसेच पक्षाचे सर्व आज माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

*आंदोलकांच्या प्रमुख मागण्या*

रस्ता रुंदीकरण लवकरात लवकर करावे.

वार्डेनची संख्या वाढवणे,

वाहतुक पोलिसांची संख्या वाढवणे.

सर्विस रोडच्या उपायोजना तात्काळ करणे.

राज्य व राष्ट्रीय मार्ग असल्यामुळे सोसायटींना ये-जा )करण्यासाठी सर्विस रोडची व्यवस्था करावी.. कात्रज कोंढवा रस्त्यावर अपघात झालेल्या अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी..

ज्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांनी आपल्या कामात कसूर केली त्या अधिकारी आणि ठेकेदारांवर कडक कारवाई करावी..

कात्रज कोंढवा रस्त्यासाठी स्वतंत्र मॉडल अधिकाऱ्याची तात्काळ नेमणूक करावी..

Advertisement

 

कात्रज कोंढवा रस्त्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे सहाय्यक आयुक्त विकास ढाकणे यांची बदली का? व कोणाच्या दबावाखाली झाली? याची चौकशी करावी व त्यांना पुन्हा नियुक्ती द्यावी.

*यावेळी बोलताना प्रशांत जगताप यांनी सांगितले की कात्रज कोंढवा रस्ता हा येथील राजकारण्यांचा आणि माजी व विद्यमान आमदार यांचा खेळ झाला आहे. सदर रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावावे तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी, वाहतूक विभागाने लक्ष द्यावे. काही ठराविक ठेकेदारांच्या आर्थिक लाभासाठी या रस्त्याला व येथील नागरिकांना वेठीस धरू नये. चार वर्षात विद्यमान आमदारांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलेले आहे हे यातून दिसून येते. स्थानिक आमदार पालकमंत्री यांनी या रस्त्यासाठी पैसे पाठवले नाहीत म्हणजे ही एक प्रकारे मतदारांची चेष्टा आहे का? की या भागातील नागरिकांची फसवणुक करतात का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

कात्रज कोढंवा रोड माघील ७ वर्षात फक्त आणि फक्त आजी व माजी आमदारांच्या टक्केवारी व श्रेयवादामुळेच रखडलेला आहे. ट्रफिक नियंत्रनासाठी मनपा प्रशासनाकडुन रस्त्यावर डिवायडर बसवण्यात आलेत खरे परंतु ते पडल्यावर दोन तीन दिवस तसेच पडुन राहुन रात्रीचे मोठ्या प्रमाणावर अपघात होतात त्यासाठी स्वंतत्र लक्ष ठेवण्यासाठी व नियंत्रनासाठी एक यंञना हवी जेणे करून त्यामुळे तरी अपघाताचे प्रमाण कमी होईल. तसेच आठ दिवसापूर्वी इस्कॉन चौकासमोरील रस्त्याच्या कामासाठी खोंदलेल्या खड्यात पडुन जी 16 वर्षीय मुलगी मृत्युमुखी पडली.त्या प्रकरणात फक्त ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला तर तो गुन्हा या रोड संबंधित जे अधिकारी वर्ग आहे त्यांच्या वर तसेच ती जागा हस्तांतरित न करता रस्त्यासाठी खोदली तरी गप्प बसणाऱ्या प्लॉट मालक सोलंकी ग्रुपवर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी रा.कॉ.पा.शरदचंद्र पवार गटाचे हडपसर मतदार संघाचे उपाध्यक्ष सुरेश उर्फ बाळा कवडे यांनी केली आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page