राधाकृष्ण विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न… राधाकृष्ण पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक विद्यालय तसेच PDP इंग्लिश स्कूलच्या इमारतीचे भूमिपूजन समारंभ संपन्न…
कोंढवा पुणे
मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे राधाकृष्ण पूर्व प्राथमिक, प्राथमिक माध्यमिक, विद्यालय तसेच PDP ENGLISH MEDIUM SCHOOL च्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने सुसज्ज इमारत, प्रयोगशाळा, संगणक रूम, प्रशस्त खोल्या, ई लर्निंग प्रोजेक्टचा समावेश असलेल्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ पार पडला. नवीन शालेय
इमारतीमधे भव्य शालेय क्रीडांगण तसेच आवश्यक त्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यावेळी मंजुळा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील शेठ परदेशी, मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव दिलीप अण्णा परदेशी, सदस्य अनिल शेठ परदेशी, तसेच संस्थेचे सर्व संचालक मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष सुनील शेठ परदेशी यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टीने सर्व आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी संस्था व राधाकृष्ण विद्यालय नेहमीच प्रयत्नशील राहील. तर संस्थेचे सचिव दिलीप शेठ परदेशी यांनी सांगितले की आज खऱ्या अर्थाने संस्थेचे सर्वेसर्वा आमचे वडील कैलासवासी बबनराव काका परदेशी यांनी बघितलेल्या स्वप्नांची परीपूर्ती झाल्याचे समाधान वाटते. गोरगरीब मुलांना शिक्षण देण्याच्या उद्देशाने उभारलेल्या संस्थेचा नवीन इमारतीमध्ये होणारा प्रवेश हा आनंद देणारा आहे. संस्था, विद्यालय यांच्या माध्यमातून होणारी सेवा व त्यातून मिळणारा आनंद आम्हाला नवीन प्रेरणा देतो. असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.