*जांभूळ येथे गणेश उत्सवानिमित्त सामाजिक उपक्रम*….
जांभूळ :
गणेश मित्र मंडळाने सार्वजनिक गणेश उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी सामाजिक भान जपत, विधायक सामाजिक उपक्रम घेत गणेश उत्सव साजरा केला.
गणेशोत्सव कालावधीमध्ये जांभूळ गावात गणेश उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये ४८ दात्यांनी रक्तदान केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष वैभव जांभुळकर यांनी दिली.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका,शैक्षणिक क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध आणि वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. खास महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रथम क्रमांक आशा नवघणे, द्वितीय क्रमांक अर्चना नवघणे, तृतीय क्रमांक. उषा जांभुळकर, चतुर्थ क्रमांक अनिता काकरे,पंचम क्रमांक रेखा धिडे यांनी पटकाविला. रेखा काकरे, उर्मिला काकरे,बेबी जांभुळकर,शांताबाई काकरे यांना लकी ड्रॉ बक्षीस मिळाले. उत्कृष्ट उखाणा शिल्पा जांभुळकर यांना पुरस्कार मिळाला. विजेत्या क्रमांकास प्रथम क्रमांकाची मानाची पैठणी तृप्ती तुळशीराम जांभुळकर व स्वाती राहुल जांभुळकर यांनी दिली. द्वितीय क्रमांकाची सोन्याची नथ उषा शंकर जांभुळकर यांनी दिली. तृतीय क्रमांकासाठी स्पिन मोप जयश्री अमित जांभुळकर यांनी दिला. चतुर्थ क्रमांकासाठी शुभांगी भोंगाडे यांनी आकर्षक बक्षीस दिले. पंचम क्रमांकासाठी गौरी मोहिते यांनी आकर्षक बक्षीस दिले .त्याचप्रमाणे उपस्थित महिलांसाठी खास आकर्षक भेटवस्तू व लकी ड्रॉ साठी श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. याप्रसंगी कुलस्वामी महिला मंचाच्या संस्थापिका अध्यक्ष सारिका ताई शेळके,रूपालीताई दाभाडे, भावनाताई शेळके, वैशालीताई कदम, नीलमताई रोहिटे उपस्थित होत्या. त्यानंतर जांभूळ गावातील सुपुत्र की ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये उज्वल कामगिरी करून जांभुळ गावचे नाव उज्वल केले अशा नागरिकांचा जांभूळ भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यामध्ये आदर्श सरपंच संतोषभाऊ भगवंत जांभुळकर, सुभेदार मेजर मारुती विठ्ठल गाडे शिक्षक आनंदराव तुकाराम जांभुळकर, रेणुका आनंदराव जांभुळकर पोलीस निरीक्षक शशिकला सचिन आढाव (काकरे) आरोग्य सेविका रेखाताई अमोल धिडे. कुस्ती क्षेत्र पै.सागर देविदास जांभुळकर. वैद्यकीय क्षेत्र. परिचारिका. रंजनाताई जयवंत खानेकर. जयवंत खानेकर. या नागरिकांचा सन्मान. ह.भ.प.मंगल महाराज जगताप ह.भ.प. चेतन महाराज सातकर. उद्योजक साहिल ढमाले यांच्या हस्ते जांभूळ भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी जांभूळ गावातील ग्रामस्थ.महिला भगिनी. मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होत्या. गावातील सर्व भजनी मंडळांची सेवा संपन्न होणार आहे. अशी माहिती श्री गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष. वैभव जांभुळकर. उपाध्यक्ष. सचिन जांभुळकर. खजिनदार यशराज जांभुळकर. मयूर पोटवडे. यांनी दिली. श्री गणेश मित्र मंडळातील सर्व सभासदांनी गणेश उत्सव साजरा करण्यासाठी परिश्रम घेतले..