जैन इंग्लिश स्कूलमध्ये दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा.
तळेगाव दाभाडे :
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जैन इंग्लिश स्कूल च्या बालवारकऱ्यांनी तब्बल दोन दिवस भक्तिमय वातावरणात आषाढीचा दिंडी सोहळा उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात पालखी पूजन आणि आरतीने करण्यात आली. अभंग गीत गायन आणि रिंगण नृत्य ह्यानंतर तुकाराम नगर येथील श्री गजानन महाराज मंदिराकडे पालखीचे प्रस्थान झाले, मंदिरात देखील अभंग गीत गायन आणि नृत्य सादरीकरणानंतर , विधिवत आरती संपन्न झाली आणि बालवारकऱ्यांनी प्रसादाचा आस्वाद घेतला.
विठ्ठल- रुक्मिणी आणि संत मंडळींच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनीआणि भव्य रथातून निघालेल्या मिरवणुकीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाचे निवेदनही विद्यार्थ्यांनी उत्तम पार पाडले.
उत्सवाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ह्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. गजानन महाराज मंदिर प्रशासनाचे सहकार्य लाभले.
ह्यानिमित्ताने शालेय प्रांगण ते मंदिर परिसरात सर्वत्र आषाढी वारीचे वातावरण पसरले होते.