हवेली क्रमांक 22 येथे बनावट कागदपत्रे जोडून दस्त नोंदणी… खोटे व्हील बनवुन सदरील दस्त नोंदणी.. अधिकाऱ्यांच्या संगनमताने दस्त नोंद…. खोटे मृत्युपत्र जोडून दस्त नोंदणी… तक्रारदाराने केली चौकशीची मागणी…
पुणे
पुण्यात अनेक ठिकाणी बोगस दस्त नोंदणीच्या कारवाया करण्यात आल्या. मागील काही दिवसात अनेक ठिकाणी बनावट कागदपत्र जोडून दस्त नोंदणी केली गेली. त्याबाबत अनेक ठिकाणी गुन्हे देखील दाखल करण्यात आले. तरीही असाच एक खोट्या दस्त नोंदणी चा प्रकार मागील काही दिवसापूर्वी हवेली क्रमांक 22 येथे घडला.
सह दुय्यम निबंधक यांच्या संगनमताने बोगस, खोटी कागदपत्रे जोडून, खोटे व्हील बनवुन सदरील दस्त नोंदणी केली गेली. सदरील दस्त नोंदणी करून मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची तक्रार करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक.
9 /9/2024 रोजी हवेली क्रमांक 22 दस्त क्रमांक 19881/2024 या दस्ताला खोटे मृत्युपत्र. खोटे व्हील बनवुन सदरील दस्त नोंदणी नोंदणी करण्यात आली. याबाबत सर्व माहिती सह. दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी संजय चव्हाण यांना होती तरीही त्यांनी सदरील दस्त नोंदणी करून दिली.
खोटे दस्त नोंदणी करण्यासाठी जर अधिकारीच पाठीशी घालत असतील तर अशा खोट्या दस्तांपासून सामान्य नागरिकांना काय न्याय मिळेल? असा सवाल उपस्थित झाला आहे.
खोटे दस्त नोंदणी करणारे अधिकारी तसेच त्यांना ओळख देणारे, साक्षीदार, या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील तक्रारदाराने केली आहे.