तळवडे येथे पीएमपीएमएल बसची धडक; ९ वर्षीय मुलीचा मृत्यू, एक गंभीर जखमी, नियमांकडे दुर्लक्ष करून बसचालकाने पळ काढल्याचे तक्रारी मध्ये नमूद

SHARE NOW

देहूगाव :

तळवडे येथील बालाजी गॅरेजसमोर झालेल्या दुर्दैवी अपघातात नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला तर तिची वहिनी गंभीर जखमी झाली. हा अपघात ९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे २ वाजता घडला. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४४८/२०२५ नोंद करण्यात आला असून संबंधित बसचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

 

घटनेचा तपशील

Advertisement

 

फिर्यादी राम मोहन श्रीसंतराम वर्मा (२३ ), रा. तळवडे, यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे, फिर्यादींची पत्नी राधा राममनोज वर्मा (२२ ) व त्यांची मेव्हणी सुधा लालबिहारी वर्मा (९) या दोघी कंपनीतून घरी पायी जात असताना पीएमपीएमएलची ई-बस (क्रमांक एम,एच -१२ ,एसएफ- ४४०३) यांची जोरदार धडक बसली.

 

बसचालक किरण भट्टू पाटील/जाधव (वय-३६ ), रा. ताम्हणे वस्ती, चिखली, याने बस भरधाव वेगात वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवल्याचा आरोप आहे. या धडकेत सुधा वर्मा हिचा जागीच मृत्यू झाला, तर राधा वर्मा गंभीर जखमी झाली.

अपघातानंतर बसचालकाने घटनास्थळावरून पळून गेल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page