शांताई रेसिडेन्सी महिलांकडून स्वच्छता व सफाई कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न.
तळेगाव दाभाडे :.
तळेगाव दाभाडे येथील शांताई रेसिडेन्सी परिसरातील महिला मंडळाच्या वतीने स्वच्छता व सफाई कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सोहळा नुकताच 23/02/2026रोजी उत्साहात पार पडला. परिसर स्वच्छ, सुंदर व निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
“आपल्या आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांचा सन्मान करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे,” असे त्या म्हणाल्या.
यावेळी सर्व सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. काही महिलांनी कर्मचाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे अनुभवही सांगितले. कर्मचाऱ्यांनीही मिळालेल्या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला व भविष्यातही निष्ठेने सेवा देण्याचे आश्वासन दिले.
या उपक्रमामुळे परिसरात आपुलकी, सामाजिक बांधिलकी व परस्पर सन्मानाची भावना अधिक दृढ झाली.






