श्री पोटोबा देवस्थानच्या विश्वस्तपदी भास्करराव म्हाळसकर यांची नियुक्ती
मावळ :
वडगाव मावळ येथील श्री पोटोबा, महादेव, मारुती, दत्त देवस्थान संस्थानच्या विश्वस्तपदी मावळ विचार मंचाचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर यांची नियुक्ती धर्मदाय आयुक्त यांनी नुकतीच केली आहे.
मावळ तालुक्याचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज,महादेव, मारुती, दत्त देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विश्वस्त पदावर स्थानिक विश्वस्त मंडळाकडून भास्करराव म्हाळसकर यांची नियुक्ती करावी, अशी धर्मदाय आयुक्त्यांकडे शिफारस करण्यात आली होती.
पुणे येथील धर्मादाय उप आयुक्त डॉ राजेश परदेशी यांनी विश्वस्त मंडळ दिलेल्या शिफारशीवर छाननी करून भास्करराव म्हाळसकर यांच्या नावास मंजुरी दिली आहे.ग्रामदैवत श्री पोटोबा,महादेव, मारुती, दत्त देवस्थान संस्थेचे अध्यक्ष किरण भिलारे,उपाध्यक्ष गणेश आप्पा ढोरे,सचिव अनंता कुडे, खजिनदार चंद्रकांत ढोरे, सल्लागार ॲड अशोक ढमाले,ॲड तुकाराम काटे,विश्वस्त अरुण चव्हाण,सुभाषराव जाधव,तुकाराम ढोरे, सुनिता कुडे असून भास्करराव (आप्पा) म्हाळसकर यांच्या नियुक्तीने सर्वांकडून स्वागत व अभिनंदन होत आहे.
भास्करराव म्हाळसकर हे मावळ भाजपचे माजी अध्यक्ष असून वडगाव शहरातील विविध सामाजिक संस्थांवर पदाधिकारी व सल्लागार म्हणून काम पाहतात. तसेच मावळातील अभ्यासू व प्रभावी वक्ते म्हणून सुपरिचित आहेत.