आळंदीत हरिनाम गजरात विजया एकादशी साजरी भाविकांची श्रींचे दशनास गर्दी ; नदी घाटावर इंद्रायणी आरती इंद्रायणी भक्त स्व. गणपतराव कुऱ्हाडे पाटील यांना श्रद्धांजली अर्पण

SHARE NOW

आळंदी :

  • आळंदी येथील माऊली मंदिरात विजया एकादशी दिनी पन्नास हजारावर भाविकांनी गर्दी करून श्रींचे दर्शन घेतले. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात नव्याने विकसित केलेली दर्शनबारी भाविकांचे गर्दीने फुलली. दर्शनबारीचे रांगेत हरीनाम गजर करीत भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. मंदिरात श्रींचा गाभारा लक्षवेधी पुष्प सजावट करीत सजविण्यात आला होता. इंद्रायणी नदी घाटावर आरती ग्रुप चे वतीने इंद्रायणी आरती हरिनाम गजरात झाली. परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रम, श्रींचे पूजा, अभिषेख, आरती, कीर्तन सेवा नामजयघोषात झाली.

विजया एकादशी दिनी आलेल्या भाविकांनी मंदिर प्रदक्षिणा, ग्रामप्रदक्षिणा दिंडीतून उत्साहात केल्या. भाविकांना फराळ प्रसाद वाटप झाले. देहूकर यांचे वतीने मंदिरात मोरे महाराज यांची कीर्तन सेवा हृदय स्पर्शी सुश्राव्य सेवा रुजू झाली. परंपरेने एकादशी साजरी करण्यात आल्याचे मुख्य व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब उपस्थित होते. संतोष महाराज मोझे यांचे वतीने हरी जागर भजन सेवा झाली. परंपरेने हरिपाठ आदी धार्मिक कार्यक्रम झाले.

विजया एकादशी दिनी आळंदी मंदिर परिसरासह इंद्रायणी नदी घाटाचे दुतर्फा,प्रदक्षिणा मार्गावर प्रदक्षिणेस भाविकांनी गर्दी केली. परंपरेने मंदिरातील धार्मिक उपक्रम विधी, देवदर्शनास श्रींचा गाभारा खुला ठेवण्यात आला होता. कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. यासाठी मंदिरातील सेवक, सुरक्षा रक्षक, बंदोबस्तावरील पोलीस यांनी काम पाहिले. आळंदी मंदीरात व्यवस्थापक माऊली वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने, सेवक, सुरक्षा रक्षक आदींनी नियोजन केले.

अलंकापुरीत एकादशी दिनी इंद्रायणी नदी घाटाची स्वच्छता ; इंद्रायणीची आरती

Advertisement

आळंदी ग्रामस्थ, इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाउंडेशन, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर घाट स्वच्छता करीत इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली. एकादशी दिनी इंद्रायणी आरती करून नदी घाट स्वच्छता करीत सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली. एकादशी निमित्त इंद्रायणी आरती उत्साहात झाली. यावेळी भाविकांनी नदी घाटावर गर्दी करून आरतीस उपस्थिती दाखवली. प्रसाद वाटप उत्साहात झाले. यावेळी इंद्रायणी नदी स्वच्छता जनजागृतीचे सेवक माऊलींचे मानकरी गणपतराव कुऱ्हाडे पाटील यांचे निधना निमित्त आरती ग्रुप तर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, विश्व्कर्म महाराज पांचाळ, सोमनाथ बेंडाले, गोविंद ठाकूर तौर, रोहिदास कदम, शैला तापकीर, राणी वाघ, अनिता शिंदे, संगीत शिंदे, शालन होनावळे, माजी नगरसेवीका उषा नरके, नीलम कुरधोंडकर, सुरेख कांबळे, शोभा कुलकर्णी, उषाबाई पाटील, सुशीला दीक्षित, पुष्पक लेंडघर, सावित्रा घुंडरे, रुख्मिणी परतूर, गंगाताई परतूर, कौसल्या देवरे, सुरेखा कुऱ्हाडे, सुनंदा चव्हाण, निर्मला आसुले, संध्या माहूरकर, सरस्वती भागवत विमल मुसळे आदीसह भाविक उपस्थित होते.

इंद्रायणी आरती ग्रुपचे वतीने अनिता झुजम, संयोजक अर्जुन मेदनकर यांनी संयोजन केले. आळंदी इंद्रायणी नदी घाटाचे पावित्र्य जोपासण्यास मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना निवेदन देण्यास सर्व महिलांनी तसेच उपस्थितांनी संमती देत स्वाक्षऱ्या केल्या. राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम यांनी आळंदीचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची भेट घेऊन नदी परिसराचे वैभवात वाढ व्हावी. यासाठी उपाय योजना करण्याची मागणी करीत असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते प्रजासत्ताक दिनाचे पूर्व संध्येला इंद्रायणी नदी घाट स्वच्छता करीत सामाजिक बांधिलकी जोपासत इंद्रायणीची आरती झाली. पसायदानाने सामाजिक उपक्रमाची सांगता झाली. इंद्रायणी भक्त माऊलींचे मानकरी गणपतराव कुऱ्हाडे पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी त्यांचे कार्याचे आठवणी सांगत मनोगते व्यक्त झाली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page