तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे. व्यसने व त्याचे दुष्परिणाम. व्यसने आणि व्यसनाधिनता या विषयाचे अभ्यासक-गणेश भेगडे
तळेगाव दाभाडे :
1) गांजा, चरसः अल्प कालावधी परीणामः स्मरणशक्ती आणि अध्ययन क्षमतेवर प्रतिकुल परीणाम, संवेदना विकृतिकरण, वेळेचे भान सुटणे, विचारशक्तीवर परीणाम अणि समस्या निवारण क्षमतेवर परीणाम, संतुलनावर परीणाम, हृदयस्पंदनात वाढ, चिंता आणि भयगंडाची झटके.
दिर्घकालीन परीणामः वाढता कफ, ब्रॉन्कायटीससारखी ढास लागणे, मानसिक एकाग्रतेवर परीणाम, आकलनशक्तीवर प्रतिकुल परीणाम.
2) हेरॉईनः चट्टे असलेल्या अणि अशक्त रक्तवाहीन्या, रक्तवाहिन्यांना जलद जिवाणु प्राादुर्भाव, त्वचेवर चट्टे उठणे गळवे उठणे, यकृतावर किंवा मुत्रपिंडांवर जलद रोग प्राादुर्भाव, मज्जापेशींवर विपरीत परीणाम, महीलांमध्ये गर्भपात किंवा वेळेपुर्वी प्रसुती, आकस्मीत भ्रुणु मृत्यु.
3) कोकेनः हृदयस्पंदनात अडथळे, हृदयविकाराचे झटके, छातीत कळा येणे, श्वासोच्छवासात आडथळे, डोकेदुखी, पचनसंस्थेवर विपरीत परीणाम, शिसारी येणे.
4) एक्स्टसी (एमडीएमए) गोंधळलेली मानसिक आवस्था, डिप्रेशन, झोपेवर प्रतिकुल परीणाम, ड्रगची तिव्र ईच्छा, कमाल तणावग्रस्तता, भयगंड, स्नायुंमध्ये तणाव, प्रतिक्षीप्त दात खाणे, शिसारी येणे, दृष्टी अंधुक किंवा धुसर होणे, जलद नेत्रपटल हालचाली, वारंवार भोवळ येणे, खुप थंडी वाजणे नंतर अचानक घामाघुम होणे, हृदयस्पंदनात वाढ, उच्च रक्तदाब, मृत्यु.
5) एलएसडीः विस्फारलेल्या बाहुल्या, शरीर तापमानात वाढ, हृदयाच्या ठोक्याच्या गतीत वाढ, वाढलेला रक्तदाब, घाम येणे, भुक मरणे, निद्राानाश, तोंड कोरडे पडणे, भयग्रस्तता आणि डिप्रेशन.
6) मेफेड्रॉनः एमडीः म्याऊ म्याउः तिव्र अनंदी मानसिक आवस्था, भिन्नलिंगी साथीदाराबाबत जवळीकीची भावना वाढीस लागणे, साथीदाराला स्पर्श करण्याची तिव्र ईच्छा होणे, कोकेन सारखेच परीणाम, अति उत्साही वाटणे,
प्रतिकुल परीणामः विस्फारलेल्या बाहुल्या, दिर्घकाळ निद्रानाश, विसराळुपणा वाढीस लागणे, भुक मरणे, दात खाणे, स्नायुंना आचके येणे, शिवराळपणा आणि हिंसकपणा वाढणे, नाकातुन रक्त येणे, नाकाच्या पडद्याची आग होणे, भयगंड वाढणे, छातीत दुखणे, डिप्रेशन वाढणे.
ही सर्वसाधारणपणे दिसणारी लक्षणे आहेत. या लक्षणांशी साम्य आढळणारी लक्षणे दीसली तरी त्या व्यक्तीला नॅगिंग करणे टाळावे.
मुलींचे नेलपॉलिश रिमुव्हर, स्पिरीट, पेट्रोल, डिझेल, पंक्चर काढण्याचे रबर सोल्युशन, चर्मकारांचे चपलांचा सोल चिकटवण्याचा गम, भिंतीवरची पाल, फ्लेवर्ड कंडोम्स ह्या सगळ्यांमध्ये साम्य कोणते?
ह्या सगळ्या बंदी येण्याची शक्यता नसलेल्या व्यसनांसाठी वापर होणाऱ्या वस्तु आहेत.
नैसर्गिकरीत्या मिळणारी चरस, गांजा, अफु, वनस्पतीजन्य पदार्थांवर रासायनिक प्रक्रिया करून मिळणारी कोकेन, हेरॉईन, मॉर्फिन सारखी ड्रग्ज किंवा एलएसडी, ॲंफेटामाईन, मेथॅंफेटामाईन, मेथॅक्विलोन, मेफेड्रॉन सारखी एकुण ११२ फॅक्टरीमेड ड्रग्ज ह्यावर कायद्यानी बंदी आहे, औषधी वापर असणारी ड्रग्ज प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळु नयेत असे अपेक्षीत तरी असते मात्र वर दिलेल्या यादीतल्या वस्तुंवर बंदी येण्याची शक्यता नाही.
लोकांच्या दोनचाकी किंवा चारचाकी वाहनांच्या फ्युएल ट्ँकजवळ घोटाळताना दिसणारी व्यक्ती चोरच असेल असे नाही, अनेकदा पेट्रोल डिझेलच्या वासाचे व्यसन असणारे वाहनांच्या आसपास घोटाळतात. काही वेळा रुमालावर नेल पेंट रिमुव्हर, ॲसिटोन टाकुन हुंगणारी किंवा मोच्याचे रबर सोल्युशनची डबी उघडुन खोल श्वास घेणारेही व्यसनी दिसतात.
व्यसन बरेच पुढे गेलेले असेल व ड्रगसाठी पैसेच नसलेली मुले काहीवेळा भिंतीवरची पाल मारुन ती जाळतात वतो धुर नाकपुड्यात ओढुनही तात्पुरते व्यसन शमवतात.
तरुण पिढीत नविन आलेले व्यसन म्हणजे फ्लेवर्ड कंडोम्स गरम पाण्यात टाकुन ते पाणी पितात कारण फ्लेवरींग साठी वापरलेली केमिकल्स स्टिम्युलंटस (उत्तेजक) असतात.
आताच्या तरुण पिढीत हातात पैसा खेळत असतो, कुटुंब व्यवस्था ढासळायला लागलेली असल्याने बंधने नसतात आणि सध्याच्या अस्थिर स्ट्रेसफुल वातावरणात स्ट्रेसबस्टर पाहीजे असल्याने ही मुले नवनविन व्यसने शोधत असतात त्यामुळे अगदी मोठ्या प्राण्यांवर शस्त्रक्रिया करताना भुल देण्यासाठी वापरले जाणारे झायलॅझाईन सारखे स्ट्राँग ड्रगही पाश्चात्य जगात झोंबी ड्रग म्हणुन लोकप्रिय होते.सर्वसाधारण मध्यमवर्गिय पालक, मुलगा व्यसनांच्या मार्गावर गेल्याच्या कल्पनेनीच सैरभैर होतात आणि हमाखास काही चुकीच्या प्रतिक्रीया देतात उदा. मुलाला घरात डांबणे, बाहेर गेल्यास त्याच्या तोंडाचा वास घेणे, खिशांची झडती घेणे इ इ. ह्या अशा प्रतिक्रीयांमुळे rebellious मुले चिडुन चुकीच्या मार्गावर जाण्याची शक्यता असते.
अशा वेळी पालक शांतपणे खालील गोष्टी मुलाच्या नकळत करु शकतात,
मुलगा कोकेन, एमडी सारखी ड्रग्ज नाकानी ओढुन (snorting) सेवन करत असेल तर बाहेरुन आल्यावर मुलानी चेहरा धुतल्यावर नॅपकिनला पांढुरक्या पावडरचे कण दिसतील.
एमडी, मेथॅॲम्फेटामाईनचे क्रिस्टल्स चुरुन पावडर करण्यासाठी व त्याच्या लाईन्स करण्यासाठी मुले जवळच्या डेबिट कार्ड, आधार कार्डसारख्या स्मार्ट कार्डसचा वापर करतात, त्या कार्डलाही त्या पावडरमुळे धुरकटपणा दिसु शकतो.
चरस, गांजा सारख्या व्यसनासाठी सिगारेट तंबाखुत मिक्स करुन तयार केलेल्या जॉईंटच्या ठिणग्यांमुळे कपड्यावर जळाल्यासारखी बारीक छिद्र दिसु शकतात. मुलाची बोटे काळवंडल्यासारखी झालेली दिसतील.
मुलाची भुक मंदावली आहे का ते पहावे, नॉर्मल मुलगा अचानक स्वत:च्या तंद्रीत रहायला लागला आहे का किंवा झटकन इरिटेट होऊन चिडचीड करायला लागला आहे का? फोनवर कुजबुजल्यासारखे किंवा आर्जवी, विनवण्या केल्यासारखे बोलणे वाढले आहे का? कपडे अस्ताव्यस्त दिसायला लागले आहेत का? एकांतात रहाणे वाढले आहे का? मुलाचा खर्च वाढला आहे का? विस्मरण वाढले आहे का? अशी चिन्हे confrontations शिवायही तपासता येतील.
जर अशी चिन्हे आढळली तर मात्र मुलाशी ठामपणे बोला, आक्रस्ताळेपणा किंवा आरोप केल्यासारखे बोलु नका.
तुम्हाला त्याच्याबद्दल सहानुभुति वाटते आहे हे त्याला जाणवु द्या. आपण मिळुन ह्यातुन मार्ग काढुया ह्याची त्याला खात्री द्या.अधिक उपचारा करिता व्यसनी रूग्ण ला चांगल्या व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करा.






