नियमबाह्य एल ई डी हेडलाईटस मुळे अपघातात वाढ

SHARE NOW

मावळ :

Advertisement

सध्या अनेक वाहन धारकांमुळे एलईडी हेडलाइट्स वापरण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. अनेक वाहन चालक नियमबाह्य पणे अधिक तेजस्वी प्रकाश देणारे एल ई डी हेडलाइट्स बसवत आहेत त्यामुळे रात्री समोरून येणाऱ्या वाहनचालकांचे डोळे दीपत असल्याने अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या प्रखर हेडलाईट्समुळे दुचाकी. चारचाकी व पादचारी नागरिकांना देखील त्रास होत आहे. अनेक जण अधिक तीव्र प्रकाशाचे एल ई डी हेडलाईट बसवत आहे विशेषतः कार .जीप यांना उच्च क्षमतेचे एलईडी दिवे लावले जातात हे दिवे इतके तेजस्वी असतात की समोरून येणाऱ्या वाहनचालकांचे पायी चालणाऱ्या नागरिकांना डोळे मिटावे लागतात किंवा थांबावे लागते त्यामुळे वाहनाचा ताबा सुटून अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. तळेगाव शहर परिसरात अनेक वाहनांना एलईडी दिवे लावल्याने अपघात झाले आहेत. वाहन उत्पादक कंपन्या हेडलाईट विशिष्ट निकषानुसार तयार करतात आणि त्यांना संबंधित विभागाची परवानगी प्राप्त असते मात्र बाजारात सहज उपलब्ध असणाऱ्या डेकोरेटिव्ह एलईडी हेडलाईट माध्यमातून अनेक वाहन चालक नियमाचे सरळ सरळ उल्लंघन करतात. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.या संदर्भात बोलताना सामाजिक कार्यकर्त्या सौ प्रगती रूकारी म्हणाल्या की परिवहन विभागाच्या मानका नुसार वाहन उत्पादक कंपन्या हेडलाइट्स तयार करतात.त्या विविध चाचण्या पार केल्यानंतरच बाजारात वापरण्यास मंजुरी देतात परंतु बाजारात मिळणारे एलईडी दिवे कोणत्याही प्रमाणपत्राशिवाय विना चाचणी वापरले जात आहे.हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे नियमबाह्य लाईटचा वापर करणारी वाहने मावळ तालुक्यासह सर्वत्र रस्त्यावर बिनधास्तपणे फिरत आहे त्यावर कारवाई होत नसल्याने अशा बेशिस्त वाहनचालकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे प्रशासनाने बेकायदेशीर एलईडी हेडलाईटची विक्री व वाहनावर बेकायदेशीर एलईडी बसवणे यावर बंदी घालावी तसेच वाहने थांबवुन नियमित तपासणी करून दोषी वाहनचालकावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी अनेक नागरिकांकडून होत आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page