डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबन प्रकरणी तळेगावात निषेध

SHARE NOW

तळेगाव दाभाडे:पंजाब मधील अमृतसर शहरात प्रजासत्ताकदिनी भारतरत्न, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती

पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी

येथील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्याचा तीव्र निषेध केला.राष्ट्रपुरूषाचा अवमान

करणाऱ्या या माथेफिरूवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल

करावा, त्याला

कठोरात कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावार यांना निवेदन देण्यात आले.

Advertisement

या निवेदनावर ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब जांभुळकर, फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे सचिव जयंत कदम , तळेगाव शहर रिपब्लिकन पार्टी (आठवले गट )अध्यक्ष संदीप शिंदे, माजी नगरसेवक अरूण माने , तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुहास गरूड , बीसीआरसीचे जिल्हाध्यक्ष किरण साळवे , रमाकांत तरुण मंडळाचे विजय आगळे,सखाराम गायकवाड आदींच्या स्वाक्षरी आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, भारताच्या प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम साजरा करीत होत असताना देशाला काळीमा लावणारी घटना पंजाब मधील अमृतसर शहरातील चौकात घडली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याची विटंबना एका माथेफिरूने शिडी लावून केली. माथेफिरूवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. समाजात विवाद निर्माण करणाऱ्यांवर कठोरात कठोर शासन करावे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page