स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दलालांवरती कारवाई करून दोन पीडित महिलांची सुटका केली..*
पिंपरी चिंचवड :
पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीत लॉजचे नावाखाली काही दलाल स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी अवैद्यरित्या मुलींना लॉज चे नावाखाली जास्त पैशाचे अमिषा दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडतात अशी गोपनीय माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी यांना प्राप्त झाली. दिघी पोलीस स्टेशन हद्दीत * सनशाईन लॉज, खडीमशीन रोड वडमुख वाडी, ता. हवेली जि. पुणे,* येथे अचानक छापा टाकला असता, 1) नितीन रावसाहेब कोकरे वय 28 वर्ष राहणार फ्लॅट नंबर 1, ज्ञानाई बिल्डिंग पठारे कॉलनी विश्रांतवाडी पुणे. लॉज चालक-मालक यांच्या ताब्यातून * दोन मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका* केली आहे. आरोपी यांना ताब्यात घेऊन दिघी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 73/2024 भादवि कलम 370 (3), अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3,4,5, अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास दिघी पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी करत आहेत. सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे सो, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी सो, मा. पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, मा. सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री सतीश माने यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक श्री. देवेंद्र चव्हाण, पोलिस अंमलदार सुनील शिरसाठ, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, रेश्मा झावरे, सोनाली माने यांनी केलेली आहे.






