शिरगावच्या उपसरपंचपदी श्रीधर गोपाळे यांची बिनविरोध निवड
शिरगाव :
शिरगाव (प्रतिशिर्डी) ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी श्रीधर गेनुभाऊ गोपाळे यांची बिनविरोध निवड झाली.
सरपंच पल्लवी गोपाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्राम विकास अधिकारी नामदेव चव्हाण यांनी काम पाहिले.
Advertisement
यावेळी सरपंच पल्लवी गोपाळे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल अरगडे, रोहिणी गोपाळे, अक्षय गोपाळे, समीर अरगडे, पूजा गोपाळे, वैशाली गोपाळे, योगिता वाघमारे, संध्या गायकवाड, ग्रामविकास अधिकारी नामदेव चव्हाण आदी उपस्थित होते.
निवडीबद्दल गोपाळे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला.






