*भारती नितीन लोखंडे यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न..*
लोणावळा :
व्ही.पी.एस इंग्लिश टिचींग स्कूल लोणावळा येथील मुख्याध्यापिका भारती नितीन लोखंडे यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा संपन्न झाला.गुरुवार दिनांक १७ एप्रिल २०२५ रोजी संपन्न झालेल्या या समारंभासाठी विद्या प्रसारिणी सभेच्या सर्व विद्या शाखांचे शिक्षक,मुख्याध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच सौ.लोखंडे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
३५ वर्ष शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सौ.लोखंडे यांनी पुणे व लोणावळा येथील संस्थेच्या विविध विद्याशखांमध्ये आपले शैक्षणिक कार्य केले.एक उपक्रमशील शिक्षिका,आदर्श मुख्याध्यापिका असा नावलौकिक त्यांचा आहे.या सोहळ्याच्या निमित्ताने सर्व शिक्षक कर्मचारी यांचेकडून सौ.लोखंडे यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
सेवापूर्तीच्या या कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्यवाह डॉ.श्री.सतीश गवळी सर,सहकार्यवाह श्री.विजय भुरके सर,शाळा समिती सदस्य श्री.गिरीश पारख,श्री.धीरूभाई टेलर, व्ही.पी.एस हायस्कुल चे प्राचार्य श्री.महिंद्रकर सर,उपमुख्याध्यापक श्री. विसाळ सर,पर्यवेक्षक श्री. रसाळ सर,श्री.गडकर सर,वरिष्ठ लिपीक श्री.कुंडलिक आंबेकर सर,व्ही.पी.एस प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जाधव मॅडम,प्रा. नाथ हरी पुरंदरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका घोलप मॅडम इ.मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षक कर्मचारी यांनी केले.सूत्रसंचालन सौ. प्रीती चुडासमा व श्री.अनिकेत रासकर यांनी केले.