नवीन समर्थ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स तळेगाव दाभाडे येथे इयत्ता १० वी,१२ वी चा शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न
तळेगाव दाभाडे :
नवीन समर्थ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स तळेगाव दाभाडे येथे इयत्ता १० वी,१२ वी चा शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न झाला.संस्थेचे कार्यसम्राट सचिव श्री. संतोषजी खांडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ०५/०२/२०२५ रोजी नवीन समर्थ विद्यालयाचा शुभेच्छा समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सुरेख असे ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. विद्यालयाच्या प्राचार्या सौ. वासंती काळोखे मॅडम यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे औचित्य साधून समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षा 2024-25 मध्ये यश मिळवलेल्या सात विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे खजिनदार माननीय श्री राजेशजी म्हस्के उपस्थित होते.त्यांनी आपल्या भाषणातून संस्थेच्या वाटचाली बद्दलची माहिती दिली. इंजीनियरिंग कॉलेजचे श्री. दिग्विजय पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन केले तसेच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळामध्ये उपलब्ध असणारे विविध कोर्सेस यांचीही सविस्तरपणे माहिती दिली.
नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी चे प्राचार्य श्री.एस.एम.सपली सर यांनी मुलांना कानमंत्र देतांना स्वतः आनंदीत रहा व इतरांनाही आनंद वाटत राहा जीवनामध्ये कुठल्याही टप्प्यावरती आनंदी राहणे महत्त्वाचे आहे असे सांगितले. नूतन महाराष्ट्र इंजीनियरिंग कॉलेजचे सीईओ डाॅ.श्री रामचंद्र जहागीरदार सर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यामधील गोष्टींचा तपशीलवार आढावा घेऊन गुरुकुल पद्धती पासूनचे शिक्षण ते आधुनिक काळातील शिक्षण यावर मुलांना मार्गदर्शन केले. इंजीनियरिंग कॉलेजचे श्री राहणे सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.नवीन समर्थ विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष महेश भाई शहा यांनी विद्यार्थ्यांना गीत ऐकवून जीवनात न डगमगता मार्गक्रमण करा असे सांगितले.आपल्या अध्यक्षीय भाषणातून नु.म.वि.प्र. मंडळाचे ज्येष्ठ संचालक, एकविरा विद्या मंदिर कार्ला प्रशालेचे शालेय समिती अध्यक्ष श्री. गोपाळे गुरुजी यांनी येणाऱ्या भविष्यकाळात स्पर्धात्मक परीक्षांचे जीवनातील महत्त्व आणि जीवनामध्ये अधिकारी पदापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारे कष्ट याबद्दल मार्गदर्शन केले व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कॉलेज विभागप्रमुख सौ. दाभाडे मॅडम ,इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक श्री. सुनील बोरुडे सर, सौ. अनुराधा हुलावळे मॅडम, कू. शिल्पा पवार मॅडम तसेच इयत्ता नववीच्या वर्गशिक्षिका सौ. धनवट मॅडम यांनी शिक्षक मनोगत व्यक्त केले. इयत्ता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी जाणाऱ्या आपल्या ताई दादांना शुभेच्छा दिल्या तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेप्रती व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि आपल्या आठवणी सांगून मनातील भावना व्यक्त केल्या. सदर कार्यक्रमाचे नियोजन नववी अ,ब,क च्या वर्गाकडे होते. त्यांचे वर्ग अध्यापक सौ. अनिता आगळमे मॅडम, श्री.बापूसाहेब पवार सर आणि सौ. धनवट मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अतिशय सुरेख नियोजन केले होते. कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन* इयत्ता नववी अ मधील कु. हर्षदा भालेकर आणि कु. नेहा ढाकरके या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे पर्यवेक्षक श्री जांभळे सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने विशेष सहकार्य केले.