तळेगावात प्रा. बानगुडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन*

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

Advertisement

तळेगाव दाभाडे येथील सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या वतीने कै. कल्याणराव उर्फ रामचंद्र जाधव यांच्या स्मरणार्थ जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लोकसंवाद व्याख्यानमाले अंतर्गत शिवचरित्राचे अभ्यासक प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक एक राष्ट्रोत्सव या विषयावर व्याख्यानाचे शनिवारी(दि.०२) सायंकाळी ६.३०वा.सुमारास आयोजन करण्यात आले आहे.अध्यक्षस्थानी मावळचे आमदार सुनील शेळके असणार आहेत.यावेळी रविंद्रनाथ दाभाडे,गणेश काकडे,बबनराव भेगडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.सदर व्याख्यान नाना भालेराव कॉलनी येथे तळेगाव स्टेशन भागात सेवाधाम ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या प्रांगणात होणार आहे.अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी दिली.

 


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page