वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मावळ तालुक्यात गुरुपौर्णिमा साजरी
मावळ :

गुरुवार दिनांक 10/7/2025 रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळेगाव येथील निवासस्थानी गुरुपौर्णिमेनिमित्त महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्धांच्या मुतीॅस मावळ तालुका अध्यक्ष नितीन ओव्हाळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. त्याचप्रमाणे सामुदायिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले.
त्यानंतर गुरुपौर्णिमेनिमित्त आलेल्या सर्व उपासक व उपासीकांना मार्गदर्शन करण्यात आले .
प्रमुख उपस्थिती
मा. नितीन मारुती ओव्हाळ -अध्यक्ष – वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका
मा.लहू लोखंडे – महासचिव
मा.सुनील वाघमारे – तालुका उपाध्यक्ष
मा.संदीप भाऊ कदम ‘मावळ तालुका – युवा अध्यक्ष सौ.मनीषाताई ओव्हाळ – मावळ तालुका महिला अध्यक्ष
सौ. हर्षदा ताई गजरमल – महासचिव
मा.पवन भाऊ उदागे- वडगाव शहर उपाध्यक्ष
व भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






