वडगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे काही तासातच सापडलेली मुलगी दिली पालकांच्या ताब्यात.
वडगाव :
काही तासांपूर्वीच एक मुलगी ही विशाल लॉन्स वडगाव शेजारील CNG पंप येथे मिळून आलेली होती.
मुलीने स्वतःचे नाव धोनी मनीष निरोतो रा. मालाड व शाळेचे नाव विकी डागरा असे सांगत आहे. कोणाच्या जवळची किंवा त्यांचे नातेवाईकाची माहिती असल्यास वडगाव मावळ पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन वडगाव पोलीस यांनी केले होते.
आपल्या सतर्क महाराष्ट्र या चॅनल ने ही बातमी प्रसिद्ध केली होती.
काही तासातच वडगाव पोलिसांना मुलीच्या पालकांचा शोध घेत सदर मुलीला तिच्या वडिलांच्या व शिक्षकांच्या ताब्यात दिले आहे.
मुलीच्या वडिलांनी व शिक्षकांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले.