किरण घोरतळे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व रक्तदान शिबीर संपन्न…
कात्रज :

दक्षिण पुणे पत्रकार संघाचे क्रियाशील सदस्य तसेच दैनिक लोकमतचे कार्यक्षम पत्रकार किरण घोरतळे पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला.वाढदिवसानिमित्त होणारा अनाठाई खर्च टाळून महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर तसेच एकाव्वन हजार रुपयांचे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक गणेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे,मंजुळा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील परदेशी,सचिव दिलीप परदेशी उद्योजक डॉ. राजकुमार लोढा, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर बाबा कदम,संभाजी थोरवे, अँड योगेश कापरे,विठ्ठल सांगळे, आकाश फाजगे,सतीश कसबे, उपस्थित होते.
दीपक चौगुले यांच्या पुढाकारातून तसेच भारती हॉस्पिटल व जीवनधारा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोफत दंत तपासणी,रक्तदान शिबिर आयोजीत करण्यात आले होते याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला.
आरोग्य शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक, महिला, जेष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. राधाकृष्ण विद्यालयात हिवाळी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांना शालेय क्रीडा साहित्याचे वाटप देखील करण्यात आले. मोफत आरोग्य शिबिराचा परिसरातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला.यासाठी कात्रज, कोंढवा, साईनगर या भागातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तर ५६ रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी परिसरातील मान्यवरांनी उपस्थित राहून किरण घोरतळे पाटील यांना शुभेच्छा दिल्या व असेच प्रकारचे विविध समाजउपयोगी उपक्रम वाढदिवसानिमित्त सर्वांनीच राबवले पाहिजे असे मत यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी, नागरिकांनी व्यक्त केले..
प्रतिक्रिया.
वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर व रक्तदान
शिबिराच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना, गरजूंना याचा फायदा झाला याचा मला मनस्वी आनंद होत आहे.महाआरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. आपला आशीर्वाद, प्रेम, सहकार्य सदैव असेच पाठीशी राहू द्या.
श्री किरण पाटील घोरतळे
सचिव राजे शिवराय प्रतिष्ठान






