तळेगाव येथे नवीन समर्थ विद्यालय या शाळेचा नूतन वास्तुचा भूमीपूजन समारंभ*
तळेगाव दाभाडे येथील नवीन समर्थ विद्यालय या ऐतिहासिक शाळेच्या नूतन वास्तुचा भूमीपूजन समारंभ बुधवारी(दि.०६)सकाळी १०.३०च्या सुमारास नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मडळ, मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूल जवळ होणार आहे. समारंभाचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे असणार आहेत.यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके उपस्थित राहणार आहेत.भूमीपूजन माजी राज्य मंत्री संजय तथा बाळा भेगडे आणि सारीकाताई संजय भेगडे यांच्या हस्ते होणार आहे.अशी माहिती नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी दिली.