तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दित अँटी स्नेचिंग बाबत प्रभावी नाकाबंदी
तळेगाव दाभाडे :
तळेगाव पोलिस स्टेशन हद्दीत बुधवार दिनांक 5 जून रोजी सकाळी ८ ते१० या वेळेत तळेगाव पोलिस स्टेशन च्या वतीने पोलिस स्टेशन हद्दित घडणाऱ्या महिलांच्या मंगळसूत्र,गळ्यातील चैन हिसकाऊन पसार होने, या प्रकारचे गुन्हे घड़त असतात यावर प्रतिबंध करण्यासाठी नागरीकात जनजागृति होने गरजेचे आहे. म्हणून तळेगाव पोलिस स्टेशन च्या वतीने पोलिस स्टेशन हद्दीत सकाळी ८ ते १० वाजता नाकाबंदी करण्यात आली होती.याप्रसंगी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्री मुुल्ला साहेब व त्यांचे सहकारी पोलिसअमलदार उपस्थित होते.
अशा प्रकार चे गुन्हे घडू नयेत यासाठी नागरीकात सतर्कता राहावी. नागरिक सतर्क रहावे .यासाठी पोलीसांकडून हा उपक्रम पोलिस स्टेशन हद्दीत करण्यात आला. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन तळेगाव पो. स्टे .चे पो. निरीक्षक श्री. मुल्ला साहेब यांनी आवाहन केले आहे.