तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीचे व शिवशंभु स्मारकाचे २० ऑक्टोबरला देवेंद्र फडणवीस. अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन २० ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली.
नगर परिषदेची इमारत सुमारे ५० वर्ष जुनी झाली असल्याने अधिकारी. कर्मचारी व नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत होता.
त्यामुळे नवीन प्रशस्त इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा वार्षिक योजना आणि नगर परिषदेमार्फत ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला.
२०२२ मध्ये अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. नगरपरिषदेची नवीन इमारत व शिवशंभू स्मारकाचे उद्घाटन २० ऑक्टोंबर रोजी होणार आहे.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीमुळे नगरपरिषदेचे कामकाज अधिक सुलभ गतीने होणार आहे. निरनिराळ्या कामासाठी नगरपरिषदेत येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सांगितले.
पाच मजली प्रशस्त इमारत. नगराध्यक्ष. उपनगराध्यक्ष. समिती सभापती. मुख्याधिकारी .उपमुख्याधिकारी. व अधिकारी वर्ग यांच्यासाठी स्वातंत्र्य दालने. प्रशस्त सभागृह. कलादालन. नागरिकांसाठी विविध सुविधा. प्रशस्त वाहनतळ असे या नव्या इमारतीचे स्वरूप आहे.






