स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा*.

 श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये 15 डिसेंबर 2023 रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे क्रीडा प्रशिक्षक श्री.संदीप चव्हाण, कु. अमृता भोर,श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक कु.अजिंक्य खांडगे,सर्व मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजनाने करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत शालेय विद्यार्थीनींच्या स्वागतगीताने करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले.

 

        कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका सौ.शमशाद शेख यांनी आंतरशालेय स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपला खेळ प्रदर्शित करण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे असे सांगून शालेय क्रीडा क्षेत्राचा आढावा सादर केला.

 

     महोत्सवाचे प्रमुख पाहुणे श्री. संदीप चव्हाण,कु.अजिंक्य खांडगे यांचा स्वागतपर सत्कार श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. मिलिंद शेलार सर यांच्या हस्ते,कु. अमृता भोर यांचा स्वागतपर सत्कार शालेय समिती अध्यक्षा सौ.रजनीगंधा खांडगे यांच्या हस्ते करण्यात आला. श्री.डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व उपस्थित संचालकांचा स्वागतपर सत्कार शालेय मुख्याध्यापिका सौ. शमशाद शेख यांनी केला.

तद्नंतर सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्योत प्रज्वलन करण्यात आली. विद्यालयातील इ.पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मार्चपास आणि इ. दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी ड्रील कवायत सादर केले.

चिकाटी, जिद्द, परिश्रमाने विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात पारंगत होऊन विजयी व्हावे असे मनोगत कु.अजिंक्य खांडगे यांनी व्यक्त केले.

वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र, पदक, पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

विजेत्या खेळाडूंचे कौतुक करून जीवन घडविणारे गुरु असतात त्यांचा सन्मान करावा असे मार्गदर्शन प्रमुख पाहुण्या कु. अमृता भोर यांनी विद्यार्थ्यांना केले.

Advertisement

क्रीडा जीवनातील अविभाज्य घटक असून निसर्गतः ओढ त्यातून निर्माण होऊन जडणघडण होते;निखळ आनंद मिळतो त्यामुळे प्रत्येकाने जिद्दीने प्रत्येक स्पर्धेत विजयी व्हावे असे प्रोत्साहनपर वक्तव्य कार्यक्रमाचे पाहुणे श्री.संदीप चव्हाण यांनी केले.

कबड्डी, खो-खो, धावणे,गोळा फेक, थाळी फेक, क्रिकेट, यासारख्या विविध सामान्यांचे आयोजन करण्यात आले.

सर्व खेळाडू मन लावून, सर्व कौशल्य पणाला लावून खेळत होते. कबड्डी खो-खो हे सर्वच खेळ अत्यंत चुरशीचे झाले .

जीवनातील ताणतणाव, थकवा दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाची आवड जोपासावी.खेळामुळे एकता, सहकार्याची भावना निर्माण होते असे मोलाचे विचार श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहसचिव तसेच स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल शालेय समिती अध्यक्षा सौ. रजनीगंधा खांडगे यांनी विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले. तसेच क्रीडा महोत्सवातील नेत्रदीपक कामगिरीबद्दल सर्व खेळाडूंचे कौतुक केले आणि भविष्यात विद्यालयातील खेळाडू राज्यस्तरावर चमकतील अशी आशा व्यक्त केली.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री.संदीप चव्हाण,कु.अमृता भोर, श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहसचिव तसेच स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल शालेय समिती अध्यक्षा सौ.रजनीगंधा खांडगे, सचिव श्री. मिलिंद शेलार सर, संचालक श्री.रामराव जगदाळे,कु.अजिंक्य खांडगे, सल्लागार श्रीमती कुसुम वाळुंज, दैनिक पुढारीचे पत्रकार श्री.जगन्नान काळे,शालेय मुख्याध्यापिका सौ.शमशाद शेख ,पर्यवेक्षिका सौ. रेणू शर्मा , माध्यमिक विभाग प्रमुख सौ. सुजाता गुंजाळ,प्राथमिक विभाग प्रमुख सौ.धनश्री पाटील, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी,स्पर्धेतील खेळाडू व विद्यालयातील सर्व विद्यार्थी, पालक वर्ग उपस्थित होते.

विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी”जय हो”जयघोष करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आणि मनमुराद आनंद लुटला.

या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शालेय मुख्याध्यापिका सौ.शमशाद शेख ,पर्यवेक्षिका सौ.रेणू शर्मा,शालेय क्रीडा प्रमुख श्री.प्रशांत भालेराव,सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षिका सौ.रुपाली कांबळे आणि सौ. प्रतिभा शिरसाट यांनी केले.

        या स्तुत्य उपक्रमाचे श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री.संतोष खांडगे, उपाध्यक्ष श्री.दादासाहेब उ-र्हे, कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब शिंदे यांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page