इंद्रायणी कॉलेजचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर येलघोल मध्ये संपन्न
इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचा विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर गावात संपन्न होत असताना वार- बुधवार दिनांक २०/१२/२०२३ रोजी सकाळी ६.००ते ७.३० पर्यंत सर्व शिबिरार्थींचा कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक एस .आर.जगताप सर यांनी योग,प्राणायाम करून घेतला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी अल्पोहार घेतल्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत धनगवाण या दोन किलोमीटर असलेल्या गावात जाऊन सहा गटातील मुलांनी सुंदर अशी ग्राम स्वच्छता केली. विद्यार्थ्यांनी “प्लास्टिकचा वापर टाळा प्लॅस्टिक मुक्त गाव करा” अशा प्रकारचा संदेश गावकऱ्यांना दिला. ग्रामस्थांनी सर्व विद्यार्थ्यांचे भरभरून असे कौतुक केले.
त्याचप्रमाणे प्रमुख व्याख्याते प्राध्यापक डॉ. प्रमोद बोराडे यांनी छत्रपती “संभाजी महाराज चरित्र”या विषयावर विद्यार्थ्यांना प्रबोधन केले.संभाजी महाराजांचा संघर्षाचा इतिहास त्यांनी कथन केला. संध्याकाळी विद्यार्थ्यांनी गट चर्चेच्या माध्यमातून “आरक्षण योग्य की अयोग्य”या विषयावर आपले मते व्यक्त केली.