शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा शिक्षकांना लाभ… Jspm कॉलेज हांडेवाडी रोड हडपसर येथे आयोजन..
कात्रज : पुणे .
जिल्हा प्रशिक्षण संस्था, समग्र शिक्षा अभियान व मनपा शिक्षण मंडळ पुणे मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर विभागांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण२.० च्या चौथ्या टप्प्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या चौथ्या टप्प्यात सुमारे 152 शाळेतील 470 मुख्याध्यापक व शिक्षक या प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत.
हे प्रशिक्षण एकूण चार टप्प्यात पार पडणार असून पुणे जिल्ह्यातील शासकीय व खाजगी शाळातील सर्व शिक्षकांना क्षमता वृद्धीसाठी हे प्रशिक्षण दिले जात आहे.त्याचा नवीन शैक्षणिक धोरण समजून अंमलबजावणीसाठी लाभ होईल असे स्मिता हडवळे यांनी सांगितले.
जिल्हा प्रशिक्षण संस्था प्राचार्य नामदेव शेंडकर, प्रभाकर प्रभाकर क्षीरसागर, शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे, मनोरमा आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक भागीरथी खंडाळे,तज्ञ मार्गदर्शन रेहाना पटेल, स्मिता हडवळे,अविंदा जगताप बोराटे, उमर शहा, रूपाली कळसाइत,ज्योती शिंदे, बलभीम बोदगे, शिरीन सय्यद, समीना काझी, नजमा पठाण, शिल्पा दाभाडे, वर्षा नायकवाडी,शितल कानडे, संदीप घोलप,कीर्ती आढाव, एस चौधर,इन्नानी, सचिन शिंदे, आनंद ढलके यांनी प्रशिक्षण दिले.