परम पूज्यनीय संत शिरोमणी स्वामी लिलाशाह महाराज यांच्या १४४ व्या जयंती निमित्त सिंधी समाजातील लाडी समाजाच्या स्वामी लिलाशाह प्रचार मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पिंपरी :
दिनांक ३ एप्रिल वार बुधवारी पिंपरी येथील झुलेलाल मंदिर ( लाल मंदिर ) येथे परम पूज्यनीय संत शिरोमणी स्वामी लिलाशाह महाराज यांच्या १४४ व्या जयंती निमित्त सिंधी समाजातील लाडी समाजाच्या स्वामी लिलाशाह प्रचार मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये १६ मुलांचा सामुहिक जेनेयु संस्कार करण्यात आले तसेच सिंधी समाजातील एका सामान्य कुटुंबातील मुलगी आणि मुलाचा सामुहिक खर्चातुन विवाह सोहळा करण्यात आला या धार्मिक विधींन साठी स्वामी महादेव दास उदासी, फुरसुंगी येथील रामदारा येथील परम पूज्य हेमंतगिरी महाराज पिंपरी येथील सोनू साई,दिपक साई आदी उपस्थित होते तसेच भजन, सामुहिक आरती तसेच धार्मिक संस्कार करण्यात आलेल्या मुलांची आणि नविन झालेल्या जोडप्याची रथा मधुन मिरवणूक काढण्यात आली या मधे सिंधी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते या वेळी सिंधी समाज बांधव मोठ्या उत्साहात उपस्थित होते कार्यक्रमाला सिंधी समाजातील शिवदास पमनानी, परमानंद जमतानी, मनोहर जेठवानी, श्रीचंद नागरानी, धनराज मंघनानी आदी मान्यवर उपस्थित होते
तसेच मंडळाचे अध्यक्ष प्रथु तिर्थानी , दिपक लोहाना,मोती रामवानी , कन्हैयालाल गंगवानी,अशोक खेमचंदानी, गोपाल त्रिलोकानी,जाॅनी थडानी, भगवान लालवानी,सिमा लालवानी, वर्षा लोहाना,दिपा रेलवानी, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात परिश्रम घेतले