संत ज्ञानदादा – संत आदिशक्ति मुक्ताबाई या बहीण भावंडांची भेट श्री पांडुरंग परमात्मा श्री आईसाहेब मुक्ताई पादुका भेट
आळंदी:
आळंदी कार्तिकी यात्रे अंतर्गत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२९ व्या संजीवन समाधी दिन सोहळा भक्तिभावात साजरा होत असताना संत मुक्ताबाईंच्या पादुकांचे परंपरे नुसार स्वागत वारकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने वातावरण भक्तिमय राहिले. संतश्रेष्ठ शिरोमणी कैवल्य साम्राज्य ज्ञानचक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्यास श्रीक्षेत्र आळंदीत मोठ्या भक्तिभावाने आणि परंपरेच्या उत्साहात साजरा होत आहे. यास लाखो भाविकांची उपस्थिती होती. देशभरातून आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी दिन सोहळा अलंकापुरी नगरीत भक्तिमय वातावरणात झाला. परंपरेप्रमाणे संत आदिशक्ती मुक्ताबाईंचे समाधी मंदिर मुक्ताईनगर येथून पादुकांचे आळंदीत आगमन व स्वागत सोहळा विशेष उत्साहात पार पडला. श्री संत मुक्ताई मठ, गोपाळपुरा आळंदी येथे दर वर्षीच्या परंपरेनुसार अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला. यात काल्याचे कीर्तन ह भ प संदीप महाराज खामणीकर यांचे सुश्राव्य झाले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याचे निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात संत नामदेव महाराजांचे १६वे वंशज ह भ प केशवदास नामदास महाराज यांची कीर्तन सेवा झाली. त्यांनी केलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीचे वर्णन म्हणजे प्रत्यक्ष समाधीचा क्षण अनुभवल्याची भावना सर्व वारकरी भाविकांना आली. त्या नंतर श्री क्षेत्र पंढरपूर येथून साक्षात पांडूरंग परमेश्वर यांच्या पादुका व श्री संत मुक्ताईंच्या पादूका यांची ज्ञानोबाराय यांच्या समाधीस स्पर्शित भेटीने वारकरी भारावून गेले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज व लाडकी बहीण मुक्ताबाई यांच्या भेटीच्या पवित्र क्षणाने वारकरी भक्तांच्या अंत:करणात भक्तिरस अधिक जागृत झाला.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप यांच्या हस्ते श्री संत मुक्ताई संस्थान मुक्ताईनगरच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार मूर्तींमध्ये संस्थानचे अध्यक्ष ॲड.रवींद्र भैय्या पाटील, विश्वस्त संदीप दादा पाटील, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रवींद्र हरणे महाराज, ह.भ.प. उद्धव महाराज, ह.भ.प. संदीप महाराज खामनिकर, ह भ प विनायक महाराज हरणे, ह भ प गजानन महाराज लाहुडकर, ह.भ.प. पंकज महाराज, ह भ प सागर महाराज लाहूडकर, पांडुरंग पाटील, छबिलदास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. आध्यात्मिक समन्वयाचे प्रतीक संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत मुक्ताबाई यांच्या विचारांचा आणि परंपरांचा समन्वय वारकरी संप्रदायाने आजही टिकवून ठेवला आहे. हा समन्वय जपत तरुण पिढीला भक्ती, समर्पण आणि सेवाभावाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
भाविक, वारकरी यांचा परतीचे वारीस माघारी प्रस्थान
श्रींचे संजीवन समाधी दिन सोहळा झाल्यानंतर अनेक भाविक, वारकरी, पादुका पालखी सोहळ्या अंतर्गत दिंडीतील वारकरी यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या गाभाऱ्यात बंधुराज आणि पांडुरंग परमात्म्याच्या साक्षीने भक्तिभावाने भक्तांचा निरोप घेतला. वारकऱ्यांनी समाधानी मनाने माघारी परतीचा प्रवास हरिनाम गजरात सुरु केला. सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक भक्ताला ज्ञानेश्वर महाराज आणि संत मुक्ताबाईं यांचे कृपेचा लाभ होवो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
आर्ट ऑफ लिविंग ची भाविकांना सेवा रुजू
आळंदी कार्तिकी यात्रा भाविकांची सेवा अंतर्गत आर्ट ऑफ लिविंग चे वतीने सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव जोपासत श्रींचे दर्शनास आलेल्या भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी पोच सेवा आणि केळी वाटप सेवा हरिनाम गजरात रुजू केळी. यावर्षी आर्ट ऑफ लिविंग चे वतीने जनजागृती करून मरकळ ते आळंदी पायी पालखी दिंडी प्रदक्षिणा देखील प्रथमच उत्साहात आयोजित करण्यात आली.
पांडुरंग परमात्मा, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपा ने, आणि श्री श्री रविशंकर जी चा आशीर्वादानें आळंदी येथे दर्शन बारीत गेल्या सहा दिवस पाणी वाटप सेवा, कार्तिकी एकादशीच्या दिवशी २४ तास केळी वाटप तसेच इंद्रायणी घाटावर कास्य थाळीच्या सहाय्याने भाविकांना तेल मालिश सेवा रुजू केली.
सर्व साधक सेवाकाणी यासाठी अगदी मनापासून सेवा केली. या सेवेसाठी वेळात वेळ काढून आले. त्या सर्वांचे आर्ट ऑफ लिविंग चे वतीने मनापासून आभार मानण्यातआले. हे सेवा कार्य फक्त एका माणसानें नाही तर सर्वांचे एकजुटीने सोबतीला होते म्हणूनच पूर्ण झाले. हा खेळ नव्हे एकूल्याचा अशीच सेवा जन्मोजन्मी घडत राहो असा आशावाद समारोपात व्यक्त करण्यात आला. हीच श्री श्री चरणी प्रार्थना. झालेली सेवा श्रींचे चरणी समर्पित करीत यापुढील काळात देखील अशीच सेवा हेंचि घडो मज जन्मजन्मांतरी असा भाव व्यक्त करण्यात आला.