ऋषिकेश तावरे यांची अन्नपुरवठा निरीक्षकपदी निवड

पुरंदर  दि. १५

पुरंदर तालुक्यातील सासवड येथील

ऋषिकेश लक्ष्मण तावरे यांची अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत अन्न पुरवठा निरीक्षक ( Food Supply Inspector ) पदी निवड झाली.

ऋषिकेश तावरे यांचे १ ली ते १० पर्यंतचे शिक्षण वाघिरे विद्यालय सासवड ,११ वी ते १२ वीचे महाविद्यालयीन शिक्षण वाघिरे कॉलेज सासवड, मेकॅनिकल इंजिनियर शिक्षण के जे कॉलेज येथे पूर्ण केले.

Advertisement

ऋषिकेश तावरे यांच्या उज्वल यशाबद्दल विविध संघटना,संस्था,पक्ष ,मंडळे यांच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

ऋषिकेश तावरे यांनी वडील सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक लक्ष्मण तावरे,आई आदर्श शिक्षिका दैवता तावरे, बहीण इंटेरियर डिझायनर ऋतुजा गवळी -तावरे यांच्या पाठिंब्याने सातत्य, जिद्द, परिश्रम व चिकाटी याच्या जोरावर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवून हे उज्वल यश संपादन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page