रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल तर्फे ‘कळी उमलताना’ उपक्रम व Ideal स्टडी अॅपचे वाटप

SHARE NOW

पुणे :

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे समाजहिताच्या विविध उपक्रमांतर्गत ‘कळी उमलताना’ हा स्तुत्य उपक्रम तसेच Ideal स्टडी अॅपचे वाटप नेरे येथील नेरे हायस्कूल येथे पार पडला.

 

या कार्यक्रमात इयत्ता 5 वी ते 9 वीतील मुलींना सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कांचन दिवेकर यांनी पौगंडावस्था, त्यातील शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळीतील स्वच्छता, तसेच सकस आहार या विषयांवर अतिशय सोप्या व समजण्यासारख्या भाषेत मार्गदर्शन केले.

यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना योग्य माहिती व जागरूकता मिळाली.

Advertisement

तसेच शाळेतील इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना ‘Ideal स्टडी अॅप’ चे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी क्लबचे अध्यक्ष अनिल ठकेकर, सचिव अतिश थोरात, वैद्यकीय सेवा प्रमुख माजी अध्यक्ष डॉ. लक्ष्मण आवटे, माजी अध्यक्ष लक्ष्मण पाटील, रो. ऍड. पौर्णिमा राऊत, तसेच अँन्स सारिका ठकेकर व वृषाली पोटे, शाळेचे शिक्षकवर्ग आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि रोटेरिअन्सचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

 


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page