“राजूभाऊ खांडभोर यांची पुणे जिल्हा शिवसेना प्रमुखपदी नियुक्ती; श्रीरंग आप्पांचा विश्वासू सहकारी पुन्हा मोठ्या जबाबदारीवर”
मावळ :
मावळ शिवसेना तालुका प्रमुख राजूभाऊ (राजेश शशिकांत) खांडभोर यांची पुणे जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेनेतील विविध पदांवर काम करताना त्यांनी शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख अशा जबाबदाऱ्यांपासून सुरुवात केली. सलग नऊ वर्षे मावळ तालुका प्रमुखपद समर्थपणे सांभाळून त्यांनी संघटनेला नवी उर्जा दिली.
मावळ लोकसभेचे कार्यसम्राट, लोकप्रिय महासंसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे विश्वासू सहकारी म्हणून खांडभोर यांनी सातत्याने संघटनेत सक्रिय काम केले. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवली असून आता ते पुणे जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.






