पवन मावळ भागातून बापूसाहेब भेगडे यांना वाढता पाठिंबा
शिरगाव:
मावळ विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पवन मावळ भागातून वाढता पाठिंबा मिळत आहे. शिरगाव येथील अभिमान टाऊनशिपमध्ये नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. सुवासिनींनी औक्षण केले.बाप्पूअण्णा माझा पाठीराखा, माझा भाऊ आला… ! अशा महिलांच्या भावना होत्या.पेढे भरवून स्वागत केले.
अभिमान टाऊनशिप मधील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
बापूसाहेब भेगडे यांनी नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.सोमाटणे फाटा ते शिरगाव हा वर्दळीचा रस्ता आहे.या रस्त्यासंदर्भात भेडसावणाऱ्या समस्या नागरिकांनी मांडल्या. साधक-बाधक चर्चा झाली. समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे बापूसाहेब भेगडे यांनी सांगितले.