राधाकृष्ण विद्यालयात “सायबर अवेरनेस ” बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…
कोंढवा
राधाकृष्ण प्राथमिक विद्यालयामध्ये “क्विकव्हील फाउंडेशन व कावेरी कॉलेज” यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सेल याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सायबर सेल याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. सायबर सेलचे फायदे तोटे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मोबाईलचे फायदे तोटे समजावून सांगण्यात आले. कावेरी कॉलेजच्या विद्यार्थिनी नेहल शर्मा व श्रेया मंगलबेढेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मोबाईलमध्ये विद्यार्थ्यांनी जास्त अडकू नये, कोणत्याही विना अनोळखीच्या लिंक ओपन करू नये. मोबाईलचा विद्यार्थ्यांनी वापर करताना काळजी कशी घ्यावी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. मोबाईल व कम्प्युटरमध्ये घुसणारा व्हायरस हा जसा मोबाईल व कॉम्प्युटर बिघडवू शकतो तसाच मोबाईल देखील जास्त वापरल्याने आपले आरोग्य बिघडवू शकते असा संदेश त्यांनी दिला. सोशल मीडिया वापरताना काळजीपूर्वक वापरावे. मोबाईलवरून कोणतीही सोशल मीडियावर, फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम, यावरती फोटो व्हिडिओ किंवा काही मेसेज करताना समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. आपली वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर टाकू नये किंवा अनोळखी व्यक्तीला देऊ नये. आपल्या मोबाईलवर आलेला कोणताही ओटीपी किंवा इतर वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये अशी माहिती त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली. फेसबुक, व्हाट्सअपवर अनोळखी व्यक्तीबरोबर बोलताना आपली फसवणूक होत तर नाही ना याची काळजी घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना “सायबर सेल” याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नागनाथ काळे सर, कैलास कोरडे सर, कुदळे मॅडम,रविन्द्र ढाकणे सर, अशोक शेंडगे सर, रवी कोपनर सर,किरण घोरतळे सर उपस्थित होते.
यावेळी विद्यालयाकडून उपस्थित समुपदेशकाचा सन्मान करण्यात आला. व विद्यार्थ्यांना सायबर सेल व तर घटकांची माहिती दिली त्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.






