पावसामुळे भात काढणीस येत आहेत अडथळे
मावळ :
मावळ परिसरात बहुतांश भागात भाताचे पीक काढणीस आलेले आहे परंतु अवेळी पडत असणाऱ्या पावसामुळे शेतात भरपूर चिखल झालेला आहे.यामुळे भात काढणीस अडथळे येत आहेत भात काढणीची मशिन चिखलात आणता येत नाही आणलीच तर मशिन चिखलात अडकून मशिनचे नुकसान होत आहे.भाताची हाताने काढणी करावी तर त्यासाठी मजूर मिळत नाहीत.जरी घरातील कुटुंबासह काढले तरी पावसाचे वातावरण असल्यामुळे काढलेला भात खराब होवून तांबूस पडण्याची शक्यता आहे यामुळे भातास पाहिजे असा भाव येणार नाही.यामुळे बळीराजाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.यामुळे भाताची काढणी शेतकरी सध्या करीत नाही. भात काढणी लांबल्यामुळे जमीन रिकामी होण्यास वेळ लागत असल्यामुळे शाळू,हरभरा,वाटाणा, आदी पीकांची पेरणी करणे पुढे ढकलावे लागणार आहे तसेच कोथिबीर,मेथी,टोमॕटो,गवार आदी पालेभाज्यांची लागण करणेही पुढे ढकलावे लागणार आहे यामुळे तेही पीक पाहीजे असे येणार नाही यामुळेही शेतक-यांचे नुकसान होणार होण्याची शक्यता आहे.यामुळे बळीराजा काहीसा संकटात सापडलेला आहे.






