नीलया सोसायटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

तळेगाव दाभाडे :

“ज्ञान हा उन्नतीचा मार्ग असून ज्ञानामुळे सन्मान प्राप्त होतो. ज्यांचा ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ असा उल्लेख केला जातो, अशा ज्ञानाच्या महामेरूची अर्थात डॉ. आंबेडकरांची १३३ वी जयंती तळेगाव नगरीतील नीलया सोसायटीत सर्वांच्या सहकार्याने मोठया उत्साहाने पार पडते, ही अतिशय आनंदाची बाब आहे.” असे गौवोद्गागार प्रसिद्ध साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांनी काढले. ते काल तळेगाव दाभाडे येथील नीलया सोसायटीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती 2024 यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाईकनवरे डेव्हलपरच्या व्यवसाय प्रक्रिया विभागाचे प्रमुख मा. अनंत नाईकनवरे, प्रा. डॉ. संदीप कांबळे, नाथा मोहिते, लक्ष्मीकांत यादव, महेश भावे, मिलिंद पाटील, सतीश दिवेकर, मंगेश शिंदे आदी उपस्थित होते. डॉ. संदीप कांबळे यांनी कार्यक्रम आयोजनामागील भूमिका प्रास्ताविकातून मांडली.

सोसायटीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त महोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी बुद्ध वंदना झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आणि सोसायटीतील महिलांनी मोठ्या उत्साहाने स्पर्धेत सहभाग नोंदवला.

सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

Advertisement

मिरवणुकीने सोसायटी परिसर दुमदुमून गेला होता. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंद नाईकनवरे हे होते. नाईकनवरे आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना म्हणाले की, “मी शिक्षणासाठी परदेशात असताना किती उत्साहाने तिकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते, हे मी अनुभवलेले आहे. मी माझ्या व्यवसायात येऊन जवळपास एक तप उलटले तरी मला अशा सार्वजनिक कार्यक्रमाला कोणी बोलवले नाही, पण नीलया सोसायटीने आयोजित केलेल्या अशा कार्यक्रमात आपण आवर्जून बोलावले आणि मला बाबासाहेबांविषयी विचार मांडण्याची संधी दिली हे मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचे ‘सिम्बॉल’ आहेत. जसे आम्ही कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये बिल्डिंग उभी करतो, तसं डॉ. आंबेडकरांनी संविधानाच्या रूपाने स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचे कन्स्ट्रक्शन करून अखंड भारताची निर्मिती केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिवराय, फुले, शाहू यांच्या विचारांचे पाईक आहेत. या समाजसुधारकांचे विचार अग्रस्थानी ठेवून डॉ. आंबेडकर मार्गक्रमण करताना दिसतात, ही अतिशय आनंदाची बाब आहे.”

प्रभाकर ओव्हाळ यांनी आठवणीतले बाबासाहेब, कला कलावंत आणि बाबासाहेब, तळेगावातले बाबासाहेब अशा अनेक ज्ञात अज्ञात पैलूतून बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्व उपस्थितांसमोर उलगडून दाखवले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेत भाग घेतलेल्या 40 स्पर्धकांचा प्रमाणपत्र, गुलाब पुष्प आणि पेन देऊन सत्कार करण्यात आला. विद्या शिंदे यांनी रांगोळी स्पर्धेचे समन्वयक तर लता रणदिवे यांनी चित्रकला स्पर्धेचे समन्वयक म्हणून काम पाहिले.

भविष्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समितीच्या वतीने सोसायटीमध्ये ग्रंथालय सुरू करण्याचा मनोदयही व्यक्त करण्यात आला.

यावेळी अनंत रावण, वीरसेन गायकवाड, अमोल रणदिवे, पराग कांबळे, दशमी इन्जे, शशिकला कांबळे, विद्या शिंदे, आशा बोरकर, गौरव कासार, धम्मपाल कांबळे, अनुराधा खडांगळे, क्षितिज सोनवणे, महेश शिंदे, दीपक जावळे, लता रणदिवे, आशिष जावळे, असित इंजे, अविनाश इंजे, अजय वचकल, अमोल रणदिवे, एकनाथ बोरकर आदींनी विशेष सहभाग घेऊन जयंती साजरी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. करुणा भोसले यांनी तर आभार प्रा. डॉ. संदीप कांबळे यांनी मानले.

****”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page